spot_img
अहमदनगरपतंग पकडणं महागात पडलं, तोल गेला जिवावर बितलं!; नगर मधील दोन बालकांचा...

पतंग पकडणं महागात पडलं, तोल गेला जिवावर बितलं!; नगर मधील दोन बालकांचा मृत्यू..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात पुन्हा कटलेल्या पतंगीला पकडण्यासाठी धावताना दोन अल्पवयीन मुलाचा विहिरीत पडून बुडाल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अनिकेत रतन आल्हाट (वय ११) व दिनेश विशाल देठे (वय १०) अशी मयत मुलांची नावे आहेत.

पोखर्डी गावा जवळच चंद्रकांत सुंदर देठे यांची शेत असून त्याठिकाणी त्यांची विहीर आहे. शाळेला सुट्ट्या असल्याने काही मुले शुक्रवारी सायंकाळी देठे यांच्या विहिरीपासून जवळच पतंग उडवित होते. त्यातील एक पतंग कटल्याने तो पकडण्यासाठी अनिकेत व दिनेश पतंगाच्या दिशेने पळत सुटले व ते दोघे विहिरीत पडले. त्यांच्या सोबत असलेल्या इतर मुलांच्या ही घटना लक्षात आली.

त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी दोन्ही मुलांना विहिरीतून तातडीने चाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच वेळी दोन कुटुंबातील मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमणावरून राडा; नेमका कसा घडला प्रकार पहा…

नगरसेवक पठारेंना पोलीस कोठडी | परस्परविरोधी फिर्याद | पठारेंचे १० लाख चोरले पारनेर | नगर...

पाणीचोरीतील पुणेकरांची दादागिरी थांबेल?; कुकडीसह साकळाई योजना दृष्टीक्षेपात

पाणीदार खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या सारिपाट / शिवाजी शिर्के मंत्रीमंडळाच्या विस्तारात...

संतोष देशमुख हत्या; बीडमध्ये मोर्चा : फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा; मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा, कोण काय म्हणाले पहा…

बीड | नगर सह्याद्री बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण...

तरुणावर धारदार शस्राने वार!; नालेगावात धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर धारदार शस्राने वारकरून जीवे मारण्याचा प्रयत्न...