अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विवाहितेचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याप्रकरणी अग्निशमन दलातील अधिकारी भरत शंकर मिसाळ यांच्यासह कटूंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार पती भरत शंकर मिसाळ, अग्निशमन अधिकारी सासरे शंकर उत्तम मिसाळ, सासु कमल शंकर मिसाळ, नणंद धनश्री शंकर मिसाळ सर्व (रा. सतरा म्युनिसिपल कॉलनी, बागरोजा हुडको, नालेगाव, अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आणि भरत मिसाळ यांचा प्रेमविवाह २०१८ साली झाला होता. सुरुवातीपासूनच विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास सुरू होता.
सासू-सासऱ्यांनी ५ लाख ५० हजार रुपयांची मागणी करत वारंवार माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. मे २०२४ ते जून २०२५ या कालावधीत मुंबईत राहात असताना पीडितेच्या पतीने वारंवार मारहाण केली. यासोबतच पती भरत मिसाळ यांनी दारूच्या नशेत शारीरिक मारहाण आणि शिवीगाळ शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.