spot_img
अहमदनगर१५० जणांवर गुन्हा दाखल; १४ वर्षीय मुलीचा न्यायासाठी संघर्ष, प्रकरण काय?

१५० जणांवर गुन्हा दाखल; १४ वर्षीय मुलीचा न्यायासाठी संघर्ष, प्रकरण काय?

spot_img

छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे असतानाही सक्षम यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला न्याय मिळवण्यासाठी तीन महिने संघर्ष करावा लागला. अखेर सातत्याने प्रयत्न केल्यानंतर १५० जणांवर गुन्हा दाखल करून संपूर्ण वऱ्हाड तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, महिला सुरक्षा संघटनेच्या राष्ट्रीय निरीक्षक जयश्री भरत घावटे (ठुबे) यांना बालविवाहाची होत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी चाइल्ड हेल्पलाइनवर संपर्क साधला. मात्र विवाहाचे ठिकाण माहीत नसल्याने लग्न थांबवणे अशक्य झाले. विवाहपार पडल्यानंतर नागरिकांनी जयश्री ठुबे यांना फोटो पाठवले.

दरम्यान १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैठण तालुक्यातील एका गावी हलवण्यात आल्याची माहिती उजेडात आली. त्यानंतर स्नेहालयसंस्थेच्या उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तातडीने चाइल्ड हेल्पलाईन १०९८, उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्प हेल्पलाईन ९०११०२६ ४९५ वावर संपर्क करावा, असे अवहान जयश्री ठुबे यांनी केले आहे.

याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी राहुल समाधान चराटे यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात १५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाईसाठी उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम, सोशल वर्कर पूजा दहातोंडे, गंगापूर पोलीस, यांनी महत्वाची भूमिका बजावली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुप्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटीलचा कान्हूरपठारला भन्नाट डान्स, पाहण्यासाठी तोबा गर्दी

बैल पोळा उत्साहात साजरा / मानाच्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक कान्हूर पठार | नगर सह्याद्री येथे आपल्या...

सराफाला लुटणारा ड्रायव्हर जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिर्डी येथे सराफ व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी यांच्या ३.२६ कोटी रुपये...

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईला जाणार्‍या मोर्चाचे पारनेरमध्ये होणार जोरदार स्वागत

पारनेर | नगर सह्याद्री मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई...

नगरमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा धुडगूस; प्राणघातक हल्ला करत ऐवज लांबविला

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमवाघा वाघा येथे शुक्रवारी मध्यरात्री...