cancer vaccine :कॅन्सर म्हटलं की धडकी भरते. भारतातच नाही तर जगभरात कॅन्सरने ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण आता रशियाने कॅन्सर रुग्णांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी दिली आहे. रशियाने कॅन्सरवर मात करणारी लस तयार केली आहे, जी कॅन्सरवरील एक मोठी क्रांती मानली जात आहे.
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख आंद्रे काप्रिन यांनी याची माहिती दिली. या लसीचा वापर 2025 च्या सुरुवातीला सुरू होईल आणि रशिया आपल्या नागरिकांना ती मोफत देणार आहे.
ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करेल, ती किती प्रभावी असेल किंवा रशिया त्याची अंमलबजावणी कशी करेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचबरोबर या लसीचं नावही अद्याप समोर आलेलं नाही.
डायरेक्टर आंद्रे काप्रिन म्हणाले की, रशियाने कॅन्सरवर मात करणारी mRNA लस तयार केली आहे. रशियाच्या या संशोधनामुळे कोट्यवधि कॅन्सर रूग्णांना दिलासा मिळणार आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ट्यूमरची वाढ रोखण्यापासून मदत होईल, हे समोर आले आहे.