अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शिवसेना नेते (शिंदे गट) तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांच्यावर राजकीय पार्श्वभूमीतून ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यात येवून सदर खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, संजय शेंडगे, रामदास भोर, बाळासाहेब हराळ, शाम नळकांडे, सुरेश तिवारी, दत्तात्रय कावरे, कैलास शिंदे, ओंकार सातपुते. प्रभाकर घोडके, अशोक झरेकर, सोमनाथ झरेकर आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर तालुक्यातील घोसपुरी येथे शनिवार दि. 2 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल हंडोरे यांच्यावर झालेल्या प्राणघत्ततक हल्ल्यामध्ये ते जखमी होऊन ते सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी कार्ले आले असता त्याचा राग मनात धरुन धुरपदाबाई सर्जेराव चव्हाण यांनी संदेश कार्ले यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशी करुन दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.
विठ्ठल हंडोरे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा
घोसपुरी येथे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल हंडोरे हे 2 ऑगस्ट रोजी सरंपच किरण साळवे, उपसरपंच संतोष खोबरे, ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर झरेकर यांच्यासमवेत गट क्रमांक 450 मध्ये मियावाकी वृक्ष लागवड या सरकारी योजनेचे कामकाज करण्यासाठी जागेची पाहणी व जेसीबीच्या सहाय्याने जागेची साफसफाई करुन सरकारी कामकाज करीत होते. याप्रसंगी सदर गटामध्ये अतिक्रमण करुन राहणारे स्वामी सर्जेराव चव्हाण यांनी अचानक येऊन विठ्ठल हंडोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हंडोरे यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. चव्हाण यांच्यावर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, आरोपीस अटक करण्यात यावी, बेकायदेशीर दारु विक्री बंद करण्यात यावी, लोकसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण मिळावे, खोट्या तक्रारी व खोट्या केसेस यांची शहानिशा करण्यात यावी अशा मागण्या ग्रामपंचायतच्यावतीने एसपींना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर सरपंच किरण शाहूराव साळवे, उपसरपंच संतोष खोबरे, पोपट झरेकर, अशोक हंडोरे, सुभाष इधाने, सुधीर झरेकर, दादाभाऊ खोबरे, प्रफुल घोडके, बाबासाहेब झरेकर, मिठू झरेकर,यशवंत झरेकर, नानासो गाढवे, सुभाष झरेकर, अमित कोकडे, ग्रामपंच्यात अधिकारी ए.पी गुंड, अक्षय झरेकर, जनार्दन झरेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.शिवसेना नेते संदेश कार्ले यांच्यावरील