spot_img
अहमदनगरनवरीसोबत लग्नात आली, दागिने घेऊन पसार झाली! करवलीने ६४ तोळ्यांवर 'असा' साधला...

नवरीसोबत लग्नात आली, दागिने घेऊन पसार झाली! करवलीने ६४ तोळ्यांवर ‘असा’ साधला डाव..

spot_img

Ahilyanagar Crime News: नवरीसोबत करवली म्हणून आलेल्या युवतीने लग्न घरातून तब्बल 64 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे दागिने व 27 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 51 लाख 86 हजारांचा ऐवज चोरून नेला होता. दरम्यान, तोफखाना पोलिसांनी केवळ 24 तासांत चोरीप्रकरणाचा छडा लावत 57 तोळे 9 ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा 44 लाख 2 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दागिने चोरणार्‍या युवतीसह दागिने विकत घेणार्‍या सोनारालाही गजाआड केले आहे.

दरम्यान, याप्रकरणी अ‍ॅड. निखील बबन वाकळे (वय 34 रा. उदय हाउसिंग सोसायटी, रेणावीकर शाळेच्या मागे, अहिल्यानगर) यांनी सोमवारी (10 मार्च) रात्री उशिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशंसा प्रशांत काळोखे (वय 19 रा. न्यू ख्रिश्चन कॉलनी, स्टेशन रस्ता, कोठी, अहिल्यानगर), किशोर सुधाकर लोळगे (वय 34 रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, हरिमळा, सोलापूर रस्ता, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?
फिर्यादी अ‍ॅड. वाकळे यांच्या लहान भावाचा 7 मार्च रोजी विवाह होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. घरातील सदस्यांनी सर्व दागिने समारंभासाठी वापरले होते. रात्री 7.45 वाजता दागिने कपाटात ठेवण्यात आले. मात्र, 9 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता कपाट तपासल्यावर दागिन्यांचा बॉक्स गायब असल्याचे निदर्शनास आले. यात 64 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे आणि 27 ग्रॅम चांदीचे दागिने चोरीला गेले होते.

दागिने खड्डा करून लपवल्याची कबुली
तपासादरम्यान, लग्नात नवरीसोबत करवली म्हणून आलेल्या एका युवतीनेच चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक तपासाव्दारे सदर युवती प्रशंसा काळोखे हिला ताब्यात घेत विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने सदरचे दागिने चोरी करून ते घराच्या बाजूला पडलेल्या मोकळ्या जागेत खड्डा करून लपवले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन 57 तोळे 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने हस्तगत केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जी. एस. महानगर बँक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार, मोठी माहिती समोर..

पारनेर | नगर सह्याद्री जी एस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन...

मनपाचे 1680 कोटींचे बजेट मंजूर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन 2024-2025 चा सुधारीत व सन 2025-2026 चा मूळ...

स्मशानभूमी परिसरात थाटला ‘ऑक्सिजन पार्क‌‌‌’; नगर जिल्ह्यातील ‘या’ गावाची चर्चा!

वृक्षप्रेमी रसाळ बंधु यांचे कार्य कौतुकास्पद: आमदार काशिनाथ दाते पारनेर । नगर सहयाद्री:- निसर्गाच्या सान्निध्यात वृक्ष...

भैय्या! सुरुवात करतोय, आशीर्वाद असू द्या; किरण काळे पुन्हा शिवसेना मजबूत करणार

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- शिवसेनेचे दिवंगत नेते माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांनी आयरनजर शहरांमध्ये...