spot_img
अहमदनगरसोने खरेदी करण्यासाठी आले, लाखांला चुना लावून गेले, नेमकं घडलं काय? पहा..

सोने खरेदी करण्यासाठी आले, लाखांला चुना लावून गेले, नेमकं घडलं काय? पहा..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री

सराफ दुकानात आलेल्या चोरट्याने सराफ व्यावसायिकाची नजर चुकवून तीन लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सदरची घटना बालिकाश्रम रोडवरील सुडके मळ्यातील दहिवळ ज्वेलर्समध्ये घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशिकांत भगवान दहिवळ (वय ६२ रा. सुडके मळा, बालिकाश्रम रस्ता) यांनी तक्रार दिली आहे.

रविवारी पावणे दहाच्या सुमारास घरातील दुकानात ठेवण्याकरिता सोन्याच्या दागिन्यांची बॅग घेऊन गेले व बॅगेतील सोन्याचे दागिने दुकानात लावत असताना एक अनोळखी व्यक्ती डोयात हेल्मेट घालून दुकानात आला. तो शशिकांत यांना सोन्याचे दागिने दाखवा असे म्हणाला असता त्यांनी दागिने दाखवण्यासाठी प्लास्टिकचा डबा टेबलावर ठेवला व त्यामधील सोन्याचे दागिने दाखवत असताना त्याने आणखी सोन्याच्या वस्तू मागितल्या. शशिकांत यांनी त्याला दुसरा डबा दाखविला. दरम्यान, तो व्यक्ती काही एक न बोलता व खरेदी न करता तेथून निघून गेला.

शशिकांत यांना शंका आली असता त्यांनी सोन्याच्या प्लास्टिकच्या डब्याची पाहणी केली. त्यामध्ये ६२ ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठणाचे पाच नग, १४.८०० ग्रॅमचे एक सोन्याचे नेलेस, सात ग्रॅमचे सोन्याचे पॅन्डलचे दोन नग, तीन ग्रॅमची एक सोन्याची अंगठी, २० ग्रॅमचे चार सोन्याचे वेलांचे जोड व १५ ग्रॅमच्या १२ सोन्याच्या बुगड्यांचे जोड असा एकुण तीन लाख ४८ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...