spot_img
अहमदनगरकस्टमर केअरला कॉल करणं महागात पडलं!, ४ लाख ६६ हजार खात्यातून लंपास,...

कस्टमर केअरला कॉल करणं महागात पडलं!, ४ लाख ६६ हजार खात्यातून लंपास, वाचा अहिल्यानगर क्राईम

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
ऑनलाइन खाद्य वितरण अ‍ॅपवरून ऑर्डर केल्यानंतर ती न मिळाल्याने गुगलवर शोधलेल्या बनावट कस्टमर केअर नंबरवर कॉल करणं एका बेकरी व्यावसायिकाला चांगलंच महागात पडलं आहे. अज्ञात सायबर चोरट्याने स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून ४ लाख ६६ हजार रुपयांची मोठी फसवणूक केली आहे.

याप्रकरणी मुरलीधर रंगनाथ काळे (वय ६०, रा. अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मुरलीधर काळे यांनी २० जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजता ‘ब्लिंकिट’ अ‍ॅपवरून घरगुती वस्तूंची ऑर्डर केली. मात्र ऑर्डर वेळेत न आल्याने त्यांनी गुगलवर ‘ब्लिंकिट कस्टमर केअर’ शोधले आणि तेथे सापडलेल्या बनावट क्रमांकावर कॉल केला. त्या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे संवाद साधत विश्वास संपादन केला आणि स्क्रीन शेअर करण्यास प्रवृत्त केले.

२२ जुलै रोजी सायंकाळी ५.०२ वाजता, मुरलीधर काळे यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून तब्बल ४ लाख ६६ हजार रुपये काढले गेले. ही रक्कम इंडियन ओव्हरसीज बँक व बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली असल्याची माहिती उजेडात आली. त्यानंतर मुरलीधर काळे यांनी राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार केली आणि त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सामान्य नागरिकांनी गुगलवर मिळणाऱ्या कोणत्याही कस्टमर केअर क्रमांकांवर अंधविश्वास न ठेवता अधिकृत वेबसाइट/अ‍ॅपवरील संपर्क क्रमांकांचा वापर करावा, तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्क्रीन शेअर करण्यास नकार द्यावा, असा सल्ला सायबर पोलीस विभागाने दिला आहे.

फळ विक्रेत्याला मारहाण
शहरातील केडगाव परिसरात पेरू विक्री करणाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तौफीक लतीफ बागवान (वय २६) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी २० ते २५अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता नगर-पुणे महामार्गावरील एमएसईबी कार्यालयासमोर सदरचा प्रकार घडला. ‘जय श्रीराम’ नारे देत शिवीगाळ करून लाकडी दांडके, लोखंडी पाईप, कमरेचा पट्टा आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हल्लेखोरांनी तौफीकचा व्हिडिओ दाखवत पुन्हा फळविक्री केली तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तपास सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नसून पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहे.

गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा
शहरातील जुनी नगरपालिका जवळील मोकळ्या जागेत शेडच्या आडोशाला अवैधरित्या गॅस रिफिलिंग सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत वसिम मुक्तार पठाण (वय २०, रा. पंचपिर चावडी, अहिल्यानगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता छापा टाकला. त्यावेळी वसिम पठाण हा रिफिलिंग करताना आढळून आला. त्याने धंदा स्वतःचा असल्याची कबुली दिली. छाप्यात ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

धारदार शस्राने कुटूंबावर वार
भिंगार येथील फकिरवाडा परिसरात मुलगा फटाके वाजवत असल्याच्या कारणावरून कुटूंबावर धारदार शस्राने हल्ला केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी साबीर शहादत शेख (वय ३५, ड्रायव्हर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. साबीर यांच्या मुलाने फटाके वाजवल्याने संतापलेल्या आरोपींनी कटुंबावर हल्ला केलाअसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सपोनि मुलगीर यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पो.हे.कॉ. बारगजे करत आहेत. आरोपीना अटक करण्याची मागणी जखमी कुटूंबाने केली आहे.

१ लाखांचा ऐवज लंपास
शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदिरात रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सोने-चांदीचे दागिने व पंचधातूचे मुकूट, तसेच दानपेटीतील रोख असा १ लाख ३३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.सदरची घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री घडली. मंदिराचे प्रमुख विवेक लक्ष्मण शिंदे (वय ४४) यांनी सकाळी ही बाब लक्षात आल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरट्यांनी मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. मात्र, गर्भगृहाचा दरवाजा न उघडता, बांबू तारेचा वापर करून मूर्तीवरील दागिने लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेआहे. सपोनि चौधरी, पो.स.ई. जाधव व मोढे यांनी घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...