मुंबई / नगर सहयाद्री : आ. रोहित पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने नोटीस पाठवली असून 24 तारखेला चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. दरम्यान आ. रोहित पवार यांनी मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर 24 तारखेऐवजी 22 किंवा 23 तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ईडी ही विनंती मान्य करेल,” असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या नोटीसीनंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. “ईडीच्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन/मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील असे ते म्हणाले.
सोलापुरात बोलताना शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “संजय राऊत, अनेक देशमुख यांनासुद्धा ईडीची नोटीस आली आली आहे. अनिल देशमुख सहा महिने तुरुंगात राहिले आहे. ईडीचा वापर विरोधकांविरुद्ध होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा दुरुपयोग होत आहे. मलाही ईडीची नोटीस झाली होती. रोहित पवार यांना नोटीस आली असेल. पण चिंता करायची कारण नाही,” असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.