spot_img
ब्रेकिंगचौंडीतील मंत्रिमंडळ बैठक जिल्हा विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल; मंत्री विखे

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठक जिल्हा विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल; मंत्री विखे

spot_img

अहील्यानगर । नगर सहयाद्री:-
चौंडी येथे मंत्रीमंडळाची प्रथमच होत असलेली बैठक जिल्ह्याच्या दृष्टीने एैतिहासिक क्षण आहे. अहील्यानगरच्या विकासाच्या वाटचालीसाठी बैठक महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.मंत्री मंडळाच्या बैठकी बरोबरच शहरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहीती देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पुण्यलोक अहील्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे त्रिशताब्दी वर्ष असून, या वर्षाचे औचित्य साधून मंत्री मंडळाची बैठक श्रीक्षेत्र चौंडी येथे घेण्याचा निर्णय झाला. मंत्री मंडळाच्या बैठकीमुळे जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तसेच काही विकासात्मक वाटचालीतील महत्वपूर्ण निर्णय या बैठकीतून होतील अशी अपेक्षा ना.विखे पाटील यांनी बोलून दाखविली.

भारतीय जनता पक्षाच्या अहील्यानगर येथील मध्यवत कार्लालय इमारतीचा भूमीपूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्यासह सभापती प्रा.राम शिंदे, आ शिवाजीराव कडले, आ.मोनिका राजळे, आ.विक्रमसिंह पाचपुते, प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी, प्रदेश महामंत्री विजय चौधरी आदि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत.

पक्ष कार्यालची भव्य आशी वास्तू शहरात उभारण्यात येत असून, सर्व सुविधांनी परीपूर्ण असे कार्यालय लवकरच तयार होईल. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संपर्काच्या दृष्टीने तसेच संघटनात्मक कार्यासाठी जिल्हा स्तरावर हे कार्यालय महत्वपूर्ण ठरणार आहे.महायुती सरकारच्या माध्यमातून शहरातील शासकीय विश्राम गृहाची इमारत पूर्ण झाली आहे. या ईमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री मंडळातील सदस्य उपस्थित राहातील.

लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या 93 व्या जयंती दिना निमित्ताने पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौडेशनच्या विस्तारीत सहाशे विद्याथनी क्षमतेच्या वसतीगृहाच्या इमारीतीचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परीषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...