राहुरी तालुयातील गावांत प्रचार दौरा
राहुरी / नगर सह्याद्री –
आपण सत्तेचा वापर तालुयातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केला. विकासकामे केल्यामुळे आपला विजय पक्का आहे, असा दावा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला. सोमवारी तनपुरे यांनी राहुरी तालुयातील उंबरे, कुक्कडवेढे, मोकळोहोळ, चेडगाव, पिंपरी अवघड, तमनर आखाडा, देसवंडी, राहुरी खुर्द, गोटुंबे आखाडा व सडे या दौर्यावर असताना उंबरे येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
तनपुरे म्हणाले, बुर्हाणनगर दौर्यावर असताना माझ्या काही कार्यकत्यांच्या गाड्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. विजय आपल्या हातून निसटतोय हे विरोधकांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी हे कृत्य केले असावे. निवडणूक लोकशाही मार्गाने जिंकता येत नसल्याचे लक्षात आल्यावर आता कुठेतरी दडपशाही करून लोकांमध्ये दहशत पसरायची, अशी त्यांची खेळी दिसतेय; पण आता कोणीही घाबरणार नाही. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. आपल्यालाही जशास तसे उत्तर देता येते. परंतु मी असे करणार नाही. मी लोकशाही पद्धतीनेच निवडणूक लढविणार आहे.
गावोगावी भेटीगाठी सुरू आहेत. पाच वर्षे केलेली विकास कामे, जनतेने दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून, अहोरात्र काम करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. लोकांच्या प्रेमावर तसेच विश्वासावर निवडणूक जिंकेल, असा माझा विश्वास आहे. यावेळी व्यासपीठावर भाऊसाहेब खंडागळे, बाबासाहेब भिटे, दत्तात्रय अडसुरे, प्रकाश देठे, सुरेश लांबे, ज्ञानेश्वर बाचकर, अर्जुन दुशिंग, बाळासाहेब आढाव, सुनील अडसुरे, राजेंद्र ढोकणे, नवनाथ ढोकणे, गोरख दुशिंग, किसन पटारे, कारभारी ढोकणे, विश्वनाथ दुशिंग, सरपंच सुरेश साबळे, उपसरपंच आदिनाथ पटारे, दत्तात्रय ढोकणे, लक्ष्मण काळे, बाबासाहेब सासवडे, संदीप दुशिंग, संदीप अडसुरे, गीताराम ढोकणे, गंगाधर अडसुरे, अतुल ढोकणे, प्राजल ढोकणे, बाबासाहेब ढोकणे, अनिल दुशिंग, अच्युतराव दुशिंग, राहुल ढोकणे, अण्णासाहेब धोत्रे, रघुनाथ ढोकणे, अशोक पंडित, रावसाहेब ढोकणे आदी यावेळी उपस्थित होते.