spot_img
आर्थिकपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी..! सोन्याची शुद्धता कशी ओळखायची? पहा एका क्लिकवर..

पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी..! सोन्याची शुद्धता कशी ओळखायची? पहा एका क्लिकवर..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
हिंदू धर्माचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा. त्यामुळे हिंदू धर्मात गुडीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घर-कार्यालयाची साफसफाई, फुलांची सजावट करत देवाला गोडाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. गुढीपाडवानिमित्त वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात. मात्र सोन्याची शुद्धता कशी ओळखायची? हे माहीतच नसते. त्यामुळे सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी नेमकं काय महत्वाचं आहे ते आपण या लेखात समजून घेणार आहोत.

सोन्याने सध्या विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याच्या दराने प्रतितोळा (‘जीएसटी’सह) ७० हजार रुपयांचा टप्पा पार केला. एकीकडे लग्नसराई व दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. पाच ते २९ मार्च या कालावधीतील सोन्याच्या बाजारातील चित्र पाहता पंचवीस दिवसांत सोन्याच्या दरात सहा हजारांची, तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ झाली आहे.

एका महिन्यात एवढा मोठा परतावा सोन्या-चांदीने दिल्याने गुंतवणूकदार सोने, चांदी खरेदीकडे वळाले आहेत. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात चांदीचा दर ७२,५०० रुपये प्रति किलो इतका होता. २६ फेब्रुवारीस सोने ६२,४०० होते, तर चांदी ७१ हजारांवर होती. पाच मार्चला सोन्याचे दर ६४,३०० तर चांदीचे दर ७३ हजारांवर (विना जीएसटी) होते. २८ मार्चपर्यंत ‘जीएसटी ‘सह सोने प्रतितोळा ७०,०४० तर चांदी प्रतिकिलो ७८, २८० वर पोचली आहे.

कॅरेटमध्ये ओळखा शुद्धता
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओद्वारे (इंडियन स्टैंडर्ड ऑर्गनायझेशन) हॉल मार्क दिले जातात. २४ कॅरेटवर ९९९, २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६, २१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० लिहिलेलं असतं. बहुतेक सोने २२ कॅरेटमध्ये विकले जाते तर काही लोक १८ कॅरेटदेखील वापरतात. सोने २४ कॅरेट पेक्षा जास्त विकले जाते. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे ?
२४ कॅरेट सोने ९९.९ टक्के शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१ टक्के शुद्ध असते. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९ टक्के इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क
सोने खरेदी करताना ग्राहकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी, सोन्याची सरकारी हमी असते, ब्यूरो ऑफ इंडियन स्टैंडर्स हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टैंडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...