spot_img
अहमदनगरसावकारी टोळक्यांची दादागिरी; बंद पाडले व्यावसायिकचे दुकान, अहिल्यानगर शहरातील धक्कादायक प्रकार

सावकारी टोळक्यांची दादागिरी; बंद पाडले व्यावसायिकचे दुकान, अहिल्यानगर शहरातील धक्कादायक प्रकार

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी व्याजापोटी दहशतीने दुकान बंद करुन, सातत्याने त्यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार चितळे रोड येथील रद्दीचे व्यावसायिक संजय कोठारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. व्यवसायचे दुकान बंद करण्यात आल्याने कोठारी दांम्पत्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून सदरील टोळक्यांवर अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संजय कोठारी यांची शहरातील चितळे रोड येथे रद्दी विकत घेण्याचा व विक्री करण्याचा व्यवसाय आहे. सन 2021 मध्ये खुब्याचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले होते. दोन्ही खुब्याच्या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागणार होता. शारीरिक त्रास होत असल्याने व जवळ पैसा उपलब्ध नसल्याने त्यांनी परिचित असलेल्या सदरील लोकांकडून आर्थिक मदत घेतली. दवाखान्यासाठी सदरील व्यक्तींनी रोख व ऑनलाईन स्वरूपात रकमा दिल्या. सर्वजणांनी एक विचाराने अडचणीच्या काळाचा गैरफायदा घेऊन दिलेले उसनवारीचे पैसे 10 टक्के व्याजाने वसुल करण्याचा निर्णय घेतला व व्याजाच्या रकमेसह सदर रकमा मागण्यास तगादा लावला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात व्याज देऊ शकत नसल्याने, त्यांनी शहरात सुरु असलेले रद्दीचे दुकान दहशतीने बंद केले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह हिरावला गेला असून, कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यामुळे कुटुंबाचे जीवन उध्वस्त झाले आहे. तर सदरील सावकारांच्या टोळक्यांकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असून, त्यांच्याकडून जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यामधील दोन सावकारांनी अडचणीचा गैरफायदा घेऊन रकमेचे स्टॅम्प दडपण आणून लिहून घेतले आहे. त्या आधारे ब्लॅकमेल करत आहे. तसेच कोरे धनादेश घेऊन खोट्या केसेस करण्याची धमकी दिली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अवैध सावकारी करणाऱ्या टोलक्यांकडून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तर अवैध सावकारीतून व्याज वसुली करणारे व व्याजापोटी दहशतीने दुकान बंद करणाऱ्या टोळक्यांवर अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी कोठारी दांम्पत्यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेर शहरातील कार्यकर्त्‍यांना मंत्री विखे पाटलांचा महत्वाचा संदेश; तयारी सुरु करा! आता शहरात विकासाची गंगा..

संगमनेर । नगर सहयाद्री: आ.अमोल खताळ यांच्‍या विजयाने तालुक्‍यात परिवर्तन होवू शकते हा विश्वास...

पालकमंत्रिपदावरून ताणाताणी; महायुतीत कोण-कोण नाराज?

मुंबई | नगर सह्याद्री:- महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून सरकारमधील तिन्ही पक्षात कमालीची अस्वस्थता दिसून येत...

संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी खा. बजरंग सोनवणे संतापले; ५ मोठ्या मागण्या कोणत्या?

बीड | नगर सह्याद्री बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात...

नगरमध्ये पावसाचा यलो अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात पुन्हा हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 26...