अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर-संभाजीनगर महामार्गावर इमामपूर शिवारातील हॉटेल निसर्ग समोर एका अज्ञात भरधाव वाहनाने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत बुलेटस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हनुमंत राधुजी शिकारे (वय 53, रा. धनगरवाडी, नेऊर, ता. जि. अहिल्यानगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हनुमंत शिकारे हे सकाळी आपल्या ( एमएच 16 डीजे 1485) क्रमांकाच्या बुलेटवरून पांढरी पूल येथे कामासाठी जात होते. नगर-संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल निसर्ग समोरून जात असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होऊन रस्त्यावर दूर फेकले गेले.
उपचारापूवच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने घटनास्थळी थांबून कोणतीही मदत न करता तात्काळ पलायन केले. या घटनेनंतर मयत हनुमंत शिकारे यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.