spot_img
ब्रेकिंगअग्रवालच्या महाबळेश्वर मधील अनधिकृत क्लबवर 'बुलडोझर'

अग्रवालच्या महाबळेश्वर मधील अनधिकृत क्लबवर ‘बुलडोझर’

spot_img

सातारा। नगर सहयाद्री-
पुण्यातील कल्याणीनगर येथे 19 मे रोजी झालेल्या अपघात प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलाने पोर्शे गाडीने दोन जणांना चिरडले. याप्रकरणामुळे राज्यातील वातावरण देखील तापले होते. आता नशेत गाडी चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचा आजोबा सुरेंद्र अगरवालचा महाबळेश्वरमधील क्लबवर बुलडोझर चालवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनियमितता आढळल्यास बुलडोझर चालवण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी दिले होते. यानंतर आता सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. सुरेंद्र अगरवालच्या मालकीच्या बारमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आले होते.

त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार सुद्धा सील केला होता. आता महाबळेश्वर येथील एम पी जी क्लब नामक रिसॉर्ट सरकारी जमिनीवर बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज (शनिवारी) बुलडोझर फिरवण्यात आला आहे. रहिवाशी भाडेपट्टीवर असलेल्या या जागेचा वाणिज्य कारणासाठी वापर होत असल्याचे आढळून आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...