spot_img
ब्रेकिंगसरपंचापाठोपाठ माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या; कुठे घडला प्रकार पहा

सरपंचापाठोपाठ माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या; कुठे घडला प्रकार पहा

spot_img

जळगाव / नगर सह्याद्री –
जळगावमध्ये माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जळगावजवळील कानसवाडा गावामध्ये ही घटना घडली. माजी उपसरपंचाची दिवसाढवळ्या चॉपर आणि चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. युवराज सोपान कोळी असं हत्या झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे. याप्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. गावातीलच ३ जणांनी त्यांची हत्या केली.

कानसवाडा गावातीलच तिघांनी आज सकाळी ८ च्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवराज कोळी यांचा अतिरक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.

रुग्णालयाबाहेर युवराज कोळी यांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला आहे. कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे. युवराज कोळी यांची हत्या का केली? यामागचे नेमके कारण समोर आले नाही. युवराज कोळी यांच्या हत्येनंतर तिन्ही मारेकरी फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार सत्यजित तांबे यांची मोठी मागणी; वकीलबांधवांसाठी ‘तो’ कायदा लागू करा

Satyajit Tambe: नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला....

शहर हादरलं! सरफिऱ्या पतीचे धक्कादायक कृत्य, चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळला..

Maharashtra Crime News: कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. चार्जिंगच्या वायरने नवऱ्याने...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी ‘मंगळवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री –  मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...