spot_img
ब्रेकिंगपाणी आणणे म्हणजे एमआयडीसीत ठेकेदारी करणे नव्हे; मंत्री विखेंचा खा. लंकेंना सूचक...

पाणी आणणे म्हणजे एमआयडीसीत ठेकेदारी करणे नव्हे; मंत्री विखेंचा खा. लंकेंना सूचक टोला

spot_img

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खा. लंकेंना टोला | कान्हूर पठार येथे मंत्री विखेंचा भव्य सत्कार
कान्हूर पठार | नगर सह्याद्री
पारनेरचा विकास दहशतीमुळे खुंटला असून तालुका ठेकेदार, माफिया राज आणि गुंंडगिरीला बळी पडला आहे. पाणी आणायचे म्हणजे एमआयडीसीमध्ये ठेकेदारी करायची नव्हे असा टोला खा. नीलेश लंके यांचा नामोल्लेख टाळत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावत पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार, जातेगाव, पुणेवाडी, राळेगणसिद्धी सर्व प्रलंबित असलेल्या पाणी योजनांच्या सर्वेक्षणास मान्यता दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्याचे भूषण तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पारनेर तालुयाच्या वतीने सोमवारी कान्हूर पठार येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे जे स्वप्न होते पश्चिम घाटावरून वाहणारे पाणी पूर्वच्या कृष्णा व गोदावरी खोर्‍यात सोडून सिंचन क्षमता वाढवणे ते स्वप्न पूर्ण करणार. पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प महायुतीचा आहे. पारनेच्या दुष्काळी भागांच्या सर्व योजना कार्यान्वीत करून पठार भागाला पाणी देणार असल्याचेही ते म्हणाले. पारनेर तालुयातील शेतकर्‍यांना खरीप, रब्बी या हंगामातील कोट्यावधी रुपयांचा पीक विमा, वीज बिल माफी, लाडकी बहीण योजनचे चाळीस कोटी रुपये पारनेर तालुयातील महिलांना दिले. या सर्व दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याने महायुतीचा विजय झाला आहे. भूमिपुत्रांना सुपा एमयडीसीमध्ये नोकरी देणार आहोत. तालुयातील माफियाराज, दहशत मोडून काढणार आहोत. पाणी आणणे हे काय एमयाएडीसीचा ठेका आणण्याचे काम नव्हे, जनतेने विधानसभेला दाते सर यांना निवडून दिले नसते तर पाच वर्ष जनतेला रेडबुल प्यावे लागले असते अशी मिश्किल टिपण्णी मंत्री विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके याचे नाव न घेता लगावली.

आमदार काशिनाथ म्हणाले, उपसा सिचन योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने या योजना रखडल्या गेल्या. या रखडलेल्या योजना कार्यान्वीत करून स्व. माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे स्वप्न असलेल्या पश्चिम घाटावरून वाहणारे पाणी पूर्वच्या कृष्णा गोदावरी खोर्‍यात सोडल्यास सिचन क्षमता वाढेल. आज या कल्पनेला मूर्त स्वरूप आले आहे. मंत्री विखे पाटील यांच्या मार्फत जलसंपदा खाते आपल्या जिल्ह्याला मिळाले आहे. गोदावरी खोर्‍यातील पाणी अडवण्यासाठी शासनाने घातलेली बंद उठवावी. लाइनिंग दुरुस्त करून शेवटच्या टेल टँक पर्यत पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे म्हणाले, पाण्याच्या तिजोरीच्या चाव्या नदीच्या पलीकडे असायच्या आता नामदार विखे यांच्या कृपेणे अलीकडे आल्या आहेत. त्यामुळे पाणी आणण्यास अडचण येणार नाही. टेंभू प्रकल्पाची पाहणी केल्याने पठार भागावरील शेतकर्‍यांना मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि ही योजना आपल्याकडे सुध्दा होऊ शकते असा आशावाद पुन्हा जागा झाला आहे.

सुजित झावरे पाटील म्हणाले की, राज्यातील पहिली पाणी परिषद पठार भागावर होणे ही पठार भागाच्या दृष्टीने सोन्याचा दिवस आहे. स्व. बाळासाहेब विखे यांच्या मार्फत पाच हजार हेटर क्षेत्र ओलिताखाली आणणारा काळू प्रकल्प, शिव डोह प्रकल्प झाला.पिपळगाव खांड प्रकल्पासाठी निधी देण्याची मागणी त्यांनी केली.

याप्रसंगी आमदार काशिनाथ दाते, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, भाजपा नेते विश्वनाथ कोरडे, माजी सभापती गणेश शेळके, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सचिन वराळ, वसंत चेडे, महिला आघाडीच्या सोनाली सालके, सुषमा रावडे, शंकर नगरे, पंकज कारखीले, सुनील थोरात, अरुण ठाणगे, विक्रम कळमकर, अर्जुन नवले, सुशीला ठुबे, पांडुरंग गायकवाड, सखाराम ठुबे, सुरेश पठारे, वसंत शिंदे, गोकुळ वाळूंज, अब्बास मुज्जावर, दिलीप दाते, दादाभाऊ सोनावळे, सुशांत ठुबे, कानिफनाथ ठुबे, रमेश भागवत, संदीप ठुबे, राजाराम एरंडे, सुभाष ठुबे, बी.एल ठुबे, भाऊसाहेब खिलारी, संतोष वाडेकर, अशोक चेडे, दादाभाऊ सोनावळे, किसन धुमाळ उपस्थित होते.

तर पारनेरमध्ये रेडबूलची फॅक्टरी
पारनेर तालुक्यातील युवकांना सुपा एआयडीसीमध्ये रोजगार मिळताच पाहिजे. परंतु, येथील काहींच्या दहशतीमुळे चांगल्या चांगल्या कंपन्या येथून बाहेर जात आहेत. विधानसभा निवडणुकीत पारनेरमधील दहशत मोडीत काढून चांगला उमेदवार निवडून दिला. अन्यथा पाच वर्ष जनतेला रेड बूल व्यावे लागले असते अशी मिश्किल टिप्पणी खा. लंके यांचे नाव न घेता केली. दरम्यान, नगर-श्रीगोंद्यातील 35 गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लावणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...