श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी येथील रहिवासी शेतकरी आण्णासाहेब लक्ष्मण पुराणे यांची कन्या कल्याणी युवराज पुराणे (काळे) यांची महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे.
घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे वीटभट्टीवर काबाडकष्ट करुण कल्याणीचे शिक्षण वडिलांनी पूर्ण केले. कल्याणीचे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले.
माध्यमिक शिक्षण मढेवडगाव येथील रयत शिक्षण संस्थेत करुण पुढील शिक्षण पुणे येथे डी.वाय.पाटील अभियांत्रिकी मध्ये पूर्ण केले. २०१३ साली आढळगाव येथील होतकरु तरुण युवराज काळे यांच्या सोबत कल्याणीचा विवाह झाला.
परंतु लग्नानंतर दहा वर्षांनी पती युवराजने पत्नी कल्याणीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. कल्याणीने घर,संसार, पती,लहान मुल पाहून रात्रंदिवस कष्ट घेऊन अपूर्ण शिक्षण पूर्ण करुण अभ्यास केला. आणि २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली.
आणि पहिल्याच प्रयत्नात तीने यश मिळवून माहेरचे आणि सासरचे नाव मोठे केले. एका वीटभट्टी कामगारांची मुलगी अधिकारी झाल्यावर गावाने मोठा आनंद उत्सव साजरा केला. कल्याणीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.