spot_img
अहमदनगरनगरमध्ये जात प्रमाणपत्रासाठी १८ हजार रुपयांची लाच; 'ती' महिला जाळ्यात

नगरमध्ये जात प्रमाणपत्रासाठी १८ हजार रुपयांची लाच; ‘ती’ महिला जाळ्यात

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात एका खाजगी महिलेच्या स्वीकारलेल्या लाचेच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करून तिला १८ हजार रुपयांसह रंगेहाथ पकडले. महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.

एका तक्रारदाराने आपल्या १९ वर्षीय मुलीच्या कुणबी जातीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी जून महिन्यात जिल्हा समितीकडे अर्ज केला होता. मात्र, प्रमाणपत्र मिळत नसल्याने तो चिंतेत होता. ऑनलाइन अर्जाची चौकशी करताना श्रीसाई सायबर कॅफेतील कर्मचार्‍याने त्याला आरोपी महिलेचा संपर्क दिला. तिने प्रमाणपत्र काढून देण्याचे आश्वासन देऊन सुरुवातीला २० हजार रुपयांची मागणी केली, जी कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी असल्याचे सांगितले.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवली.

पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने व्हॉइस रेकॉर्डरचा वापर करून पडताळणी केली. नोबेल हॉस्पिटल, रॉयल हॉटेल आणि इतर ठिकाणी झालेल्या चर्चेत महिलेची लाच मागणी स्पष्ट झाली. तिने अखेर १८ हजार रुपयांवर तडजोड केली आणि वरून प्रेशर आहे, लगेच काम करून देती असे सांगितले. लाचलुचपत विभागाने सापळा रचला. तक्रारदाराने ९,५०० रुपयांच्या खर्‍या नोटा आणि ८,५०० रुपयांच्या बनावट नोटांवर पावडर लावली. दोन शासकीय पंचांसह तक्रारदाराने महिलेला सिटी प्राइड हॉटेलजवळ बोलावले. जुना पिंपळगाव रोडवरील चेतन हॉस्पिटल रोडवर महिलेच्या हातात १८ हजार रुपये दिले. त्यानंतर लाचलुचपत पथकाने सदर महिलेला ताब्यात घेतले.

आरोपी महिलेचे नाव उषा मंगेश भिंगारदिवे (वय ३३, रा. प्लॉट नं. १०३, श्रीनाथ कॉम्प्लेस, भिस्तबाग चौक) असून, ती खाजगी महिला आहे. तिने ही रक्कम जात पडताळणी कार्यालयातील १०-१५ जणांसाठी मागितल्याचे कबूल केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मार्केटयार्डमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जाळून खाक

दीड लाखांचे नुकसान, वर्षानुवर्षांची बिले जळून खाक! अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मार्केटयार्डमधील जयप्रकाश कस्तुरचंद कटारिया...

लाडक्या बहि‍णींवर सरकारचा लेटरबॉम्ब! ‘या’ महिलांनाच मिळणार दीड हजार

मुंबई / नगर सह्याद्री - 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील सर्व लाभार्थींना ईकेव्हायसी बंधनकारक करण्यात...

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेला धमक्या; हुंडा, अत्याचार, कुठे कुठे काय काय घडलं पहा

विवाहितेची पती-सासरच्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा अहिल्यानगर / नगर सह्याद्री - लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच...

बापरे, गुराख्यावर बिबट्याचा हल्ला, पुढे काय घडले पहा

नागरिकांत घबराट; नागरिकांनी सतर्क रहावे : धाडे पारनेर | नगर सह्याद्री येथील वरखेड मळा परिसरात जनावरे...