spot_img
अहमदनगरहिंदुत्व शहराचा श्वास!,'हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना..'; वाचा,किरण काळे म्हणाले..

हिंदुत्व शहराचा श्वास!,’हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना..’; वाचा,किरण काळे म्हणाले..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेनेला नगरकरांनी मागील पस्तीस वर्षांपासून भरभरून प्रेम दिल आहे. या शहरामध्ये हिंदुत्वाची मशाल धगधगती ठेवण्याचे काम हे शिवसैनिकांनी केलं आहे. प्रभू श्रीराम हे आमचं दैवत आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकत्रित करत पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करणार आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेचे किरण काळे यांनी केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने प्रभू श्रीरामांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर काळे बोलत होते. यावेळी शिवसेना नेते तथा प्रवक्ते खा. संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते, अहिल्यानगर शिवसेना संपर्कप्रमुख आ. सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, ज्येष्ठ शिवसैनिक रावजी नांगरे, डॉ. श्रीकांत चेमटे, विलास उबाळे, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, शंकर आव्हाड, किरण बोरुडे, किशोर कोतकर, भाकरे महाराज मनीषशेठ गुगळे, दिलदार सिंग बीर, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे सर, सुरज ठोकळ, मनीष गुगळे, ऋतुराज आमले, जेम्स आल्हाट, सुजय लांडे, भाकरे महाराज, उमेश काळे, किरण डफळ, दत्तात्रय गोसंके, मुन्ना भिंगारदिवे, अमित लद्दा आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

काळे पुढे म्हणाले की, या शहरातील शिवसेनेचा जन्मच मुळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून झाला. शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजे शिवसेना असं अतूट नातं गेल्या अनेक वर्षांपासूनच आहे. त्यामुळे शिवसैनिकांना हिंदुत्व हे काही नवीन नाही. हिंदुत्व हा अहिल्यानगर शहराचा श्वास आहे. तो कुणी संपवू शकत नाही असे काळे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अज्ञात वाहनाने बाप-लेकाला उडवले! ‘या’ रोडवर भीषण अपघात..

पाथर्डी | नगर सहयाद्री पाथर्डी-शेवगाव रोडवरील महावितरणच्या गेटजवळ सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता मॉर्निंग...

१५०० रुपये कायमचे बंद? लाडकी बहीण योजनेतील १० लाख महिलांचे अर्ज बाद! यादीत तुमचेही नाव नाही ना?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी...

अहिल्यानगरमध्ये खळबळ! ठाकरे गटाच्या ‘बड्या’ नेत्याला अटक, कार्यालयातच केला महिलेवर अत्याचार..

संपर्क कार्यालयातच महिलेवर अत्याचार; शहरप्रमुख किरण काळे यांना अटक अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगरमधून एक खळबळजनक...

आजचे राशी भविष्य! आषाढ महिन्यातील मंगळवार ‘या’ राशींना ठरणार लाभदायक

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह...