Assembly Election: लोकसभेनंतर राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकांबाबत मोठी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तर हरियाणामध्ये एक टप्प्यात निवडणूक होणार असून 1 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येईल. तर जम्मू काश्मिरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा 18 सप्टेंबरला, दुसरा टप्पा 25 सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्याचा निकाल 4 ऑक्टोबरला लागणार आहे. त्याचा निकाल 4 ऑक्टोबरला लागणार आहे.
हरियाणाच्या 90 जागांसाठी मतदान
हरियाणात एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 73 सर्वसाधारण, SC-17 आणि ST-0 आहेत. हरियाणात एकूण 2.01 कोटी मतदार असतील. त्यापैकी 1.06 पुरुष, 0.95 कोटी महिला, 4.52 लाख नवीन मतदार आणि 40.95 लाख युवा मतदार आहेत. हरियाणाची मतदार यादी 27 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध होईल.