spot_img
राजकारणब्रेकिंग ! संसदेत चाललं काय? आधी लोकसभेतले ३३ आता राज्यसभेतील 34 खासदार...

ब्रेकिंग ! संसदेत चाललं काय? आधी लोकसभेतले ३३ आता राज्यसभेतील 34 खासदार केले निलंबित, आतापर्यंत 81 विरोधी खासदार झालेत निलंबित

spot_img

नवी दिल्ली / नगरसहयाद्री : खासदार निलंबनाबाबत एक मोठी बातमी आली आहे. दुपारी लोकसभेतील ३३ आमदार निलंबित केले होते. आता राज्यसभेतील 34 खासदार निलंबित केले आहेत. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत विरोधक गृहमंत्री अमित शाह यांना बोलण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

संसदेतील घुसखोरीवरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. या गदारोळानंतर लोकसभा आणि राज्यसभेच्या अनेक खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. आतापर्यंत एकूण 81 विरोधी खासदारांचे निलंबन झाल आहे. शुक्रवारी दोन्ही सभागृहातील एकूण 14 खासदारांचे निलंबन केल्यानंतर आज, सोमवारी सभापतींनी आणखी 33 खासदारांना लोकसभेतून निलंबित केले. तर, राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी सभापतींनी 34 खासदारांना निलंबित केले आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 81 खासदारांवर कारवाई झाली आहे.

लोकसभेतून निलंबित खासदारांची नावे
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत अपूर्वा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेल्वम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमती, के नवासकानी, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॉय, शताब्दी रॉय, असिथ कुमार मल, कौशलेंद्र कुमार, अँटोनी कुमार, एस एस पलनामनिक्कम, तिरुवरुस्कर, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस रामा लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई आणि टीआर बालू यांना निलंबित करण्यात आले.

राज्यसभेतून निलंबित खासदारांची नावे
तर, राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये प्रमोद तिवारी, जयराम रमेश, अमी याज्ञिक, नारायण भाई राठवा, शक्ती सिंह गोहिल, रजनी पाटील, सुखेंदू शेखर, नदीमुल हक, एन. षणमुघम, नासिर हुसेन, फुलो देवी नेतान, इम्राम प्रतापगढ़ी, रणदीप सुरजेवाला, मौसम नूर, समीरुल इस्लाम, रणजीत रंजन, फैयाज अहमद, मनोज झा, रामनाथ ठाकूर, अनिल हेगडे, वंदना चव्हाण, रामगोपाल यादव, जावेद अली खान, जोस के मणी, महुआ मांझी, अजित कुमार आदी खासदारांचा समावेश आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरमध्ये खळबळ! मतपेट्या आणलेल्या बसमध्ये सापडले नोटांचे बंडल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी...

उमेदवारांची धाकधूक वाढली! नगरमध्ये कुणाच्या अंगावर पडणार गुलाल…

विधानसभेच्या परिक्षेचा शनिवारी निकाल | समर्थकांकडून गुलालाची तयारी | चौकाचौकात दावे प्रतिदावे अहिल्यानगर | नगर...

भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात; संगमनेरमध्ये झळकले फ्लेक्स

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून आता वेध लागलेत ते निकालाचे....

शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; कुठे घडली घटना

छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री:- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील एका 31 वषय महिलेवर...