spot_img
अहमदनगरब्रेकिंग! नगरच्या राजकारणात ट्विस्ट!; सत्यजित तांबे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट?...

ब्रेकिंग! नगरच्या राजकारणात ट्विस्ट!; सत्यजित तांबे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकिय चर्चांना उधाण…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची घोषणा करुन सरशी घेतली आहे. उमदेवारांच्या पहिल्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश केला आहे. तर महाविकास आघाडीत अजून काही जागांवर तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत असून आता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबेअचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्यावर आपली नजर असल्याचे म्हटले होते. सत्यजित तांबे यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार, अशी लोक जास्त दिवस बाहेर ठेवली की, आमची नजर त्यांच्याकडे जाते. आम्ही चांगली माणसं गोळा करत आहोत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत वक्तव्य केले होते.

यानंतर सत्यजित तांबे यांना भाजपने छुपा पाठींबा दिल्याची चर्चा होती. सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. आता आमदार सत्यजित तांबे अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याकडे आता सर्वांचे कान लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...