नवी दिल्ली / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे.
शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावं मागवली होती. त्यांपैकी हे एका नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं असणार आहे. चिन्हबाबत अद्याप निर्णय झाला नाही अशी माहिती मिळाली आहे.