spot_img
अहमदनगरBreaking News: प्रवरा नदीपात्रात पुन्हा दोन तरुण बुडाले!

Breaking News: प्रवरा नदीपात्रात पुन्हा दोन तरुण बुडाले!

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री-
अकोल्यातील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता आता. पुन्हा दोन मुलांचा प्रवरा नदीपात्रात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करत आहे. गंगामाई घाटावर दोन विद्यार्थी पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आदित्य रामनाथ मोरे (वय १७, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व श्रीपाद सुरेश काळे (वय १७, रा. कोळवाडे, ता. संगमनेर) असे मयत मुलांचे नाव आहे.

शुक्रवारी (दि.२४ मे) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आदित्य व श्रीपाद हे दोघे शिक्षण घेत होते. ते महाविद्यालयीन मित्रांसोबत एकत्रितपणे दुपारच्यावेळी घुलेवाडी परिसरात बसले होते. मित्रांनी मिळून प्रवरा नदीवर पोहायला जाण्याचा निर्णय घेतला.

शरीर थंड करण्यासाठी त्यांनी नदीत उड्या घेतल्या. यावेळी त्यांना पाण्याचा फारसा ठाव लागला नाही. दरम्यान, सर्व मित्र कडेला पोहत होते. मात्र, आदित्य व श्रीपाद हे खड्ड्याकडे गेले एका ठिकाणी खोल गर्त्यात सापडले.

जेव्हा या दोघांच्या नाकातोंडात पाणी जायला सुरूवात झाली तेव्हा त्यांनी गटांगळ्या खाल्ल्या. वाचवा, वाचवा म्हणून आवाज देखील दिला. मात्र, ठाव न लागल्याने दोघांना पुरेसा श्वास घेता आला नाही.त्यामुळे दोघांना मृत्यूला सामोरे जावे लागले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...