spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग ! ज्योती मेटे यांचा सरकारी नोकरीचा राजीनामा, बीडमधून लोकसभेला उतरणार

ब्रेकिंग ! ज्योती मेटे यांचा सरकारी नोकरीचा राजीनामा, बीडमधून लोकसभेला उतरणार

spot_img

बीड / नगर सह्याद्री : लोकसभेच्या अनुशंघाने एक मोठी घडामोड घडली आहे. बीडमधून दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी तथा शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉक्टर ज्योती मेटे लोकसभेला शरद पवार गटाकडून उतरणार अशा चर्चा होत्या.

परंतु आता त्या खरोखर लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्योती मेटे यांनी अप्पर सहकार विभागाच्या सहनिबंधक पदाचा राजीनामा देत स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. संबंधित विभागाने ज्योती मेटे यांचा राजीनामा स्वीकारल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे.

यामुळे ज्योती मेटे यांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून त्यांच्या बीड लोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाला आहे. यातच ते शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळाले नाही. एक चर्चा अशी आहे की, त्या मनोज जरांगे पाटलांचा अपक्ष झेंडा हाती घेऊ शकतात. मात्र ही अद्यापही फक्त चर्चाच आहे.

दरम्यान, राजीनामा देण्याआधी माध्यमांशी संवाद साधताना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत ज्योती मेटे म्हणाल्या की, ”गेल्या अनेक दिवसांची पोकळी भरून काढण्यासाठी आता मी ठरवलं आहे. त्यामुळे मी आता यापुढे पूर्णपणे राजकीय काम करणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...

बिहारमध्ये NDA ला यश, महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले

मुंबई / नगर सह्याद्री - बिहार विधानसभा निवडणूक २०२५चा आज (१४ नोव्हेंबर) निकाल जाहीर...

बिबट्यांचे हल्ले; पालकमंत्री विखेंनी घेतली मोठी भूमिका

बिबट्यांच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा नियोजनातून ८ कोटी १३ लाखांचा निधी – पालकमंत्री डॉ....