spot_img
अहमदनगरब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडली

ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडली

spot_img

Maharashtra Politics News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्या आजच्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. रविवारी नाशिकमध्ये आमदार सरोज आहेर यांच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती, मात्र त्यानंतर त्यांची तब्येत खालावली. रविवारी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान भाषण करताना अजित पवार यांनी स्वतःची प्रकृती ठीक नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

त्यामुळे त्यांनी तत्काळ नाशिकमधील पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून पुण्याकडे प्रयाण केले. मात्र, पुण्यात उपचार घेतल्यानंतरही त्यांना पूर्णतः बरे वाटत नसल्याने आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अजित पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने औंध येथील आयटीआयमध्ये (ITI) आयोजित प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकणार नाहीत.

त्यांच्या अनुपस्थितीमुळे या कार्यक्रमावर परिणाम होणार असून, पुढील नियोजन कसे असेल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.अजित पवार यांच्या तब्येतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आगामी राजकीय आणि प्रशासकीय बैठकींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती लवकरच समोर येईल, मात्र त्यांच्या तब्येतीच्या स्थितीमुळे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… लाडक्या बहिणींचा लाभ बंद करणार; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत लाखो अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. या...

शहर हादरलं! आईनेच केला वडिलांचा खून? प्रेमसंबंधासाठी प्रियकरासोबत ‘असा’ रचला कट!

Maharashtra Crime News: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी हृदयद्रावक घटना हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आली आहे....

… आता संधी द्या! आमदार दाते यांच्याकडे खडकवाडी ग्रामस्थांची मोठी मागणी, वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये खडकवाडी खऱ्या अर्थाने मोठे बाजारपेठेचे ठिकाण...