spot_img
अहमदनगरAhmednagar: ब्रेकिंग! काँग्रेस शहराध्यक्षावर हल्ला!! विखे-थोरात यांच्यात पुन्हा एकदा राजकीय रणकंदन

Ahmednagar: ब्रेकिंग! काँग्रेस शहराध्यक्षावर हल्ला!! विखे-थोरात यांच्यात पुन्हा एकदा राजकीय रणकंदन

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राण घातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. संगमनेर तालुयातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना हा हल्ला झाला. राजकीय दृष्ट्या विळ्या-भोपळ्याचे नाते असलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यात या घटनेनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने पुन्हा एकदा राजकीय रणकंदन माजण्याची शक्यता आहे.

दहा ते बारा जणांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात हा हल्ला झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी; की काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले मंगळवारी सायंकाळी कार्यक्रमावरून घरी परतत होते. त्यावेळी दहा ते बारा जणांनी अचानक गाडी समोर येत त्यांच्यावर रॉडने प्राणघातक हल्ला केला.

राहाता तालुयातील लोणी गावात संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सचिन चौगुले व त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरणे जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोघांनाही संगमनेर तालुयातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

पदाधिकार्‍यांवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी हॉस्पिटल बाहेर मोठी गर्दी जमली होती. हल्ल्याची घटना दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आ. थोरात यांनी केला.

पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही थोरात यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी सचिन चौगुले यांनी विखे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर हा हल्ला झाल्यामुळे पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील वाद समोर आला आहे. नेमके हल्लेखोर कोण हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...