spot_img
अहमदनगरब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांची कार पेटवली

ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांची कार पेटवली

spot_img

पंढरपूर । नगर सहयाद्री:-
कीर्तनकार अजय महाराज बारस्कर यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच अजय महाराज बारस्कर यांची कार पंढरपूर येथे जळाल्याची घटना समोर आली आहे. बारस्कर यांनी मात्र ही कार कुणीतरी पेटवली असल्याचा आरोप केला आहे. आषाढी एकादशीनिमित्त १६ जुलैला पंढरपूरला गेले असताना ही घटना घडलीय.

बारस्कर यांनी ६५ एकरच्या पार्किंगमध्ये कार लावून ते चंद्रभागा स्नान करण्यासाठी गेले होते. तिथून गर्दीमुळे ते पार्किंगला पोहोचू शकले नाही. दुसर्‍या दिवशी ते पोहोचले असता कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली.
अजय बारस्कर यांनी या प्रकरणी पंढरपूर पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

अजय बारस्कर यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. तेव्हापासून आपल्याला जीवे मारण्याच्या धमया मिळत असल्याचा दावाही अजय बारस्कर करतात आहेत. आता ही कार पेटवली असल्याचा संशय बारस्कर यांनी व्यक्त केला आहे. अजय बारस्कर आषाढी वारीसाठी पंढरपुरात आले होते.

६५ एकर परिसरात टोयाटो गाडी पार्किंग केली होती. ती गाडी जाळली आहे. परवा मध्यरात्री ते काल दुपारच्या दरम्यान गाडी अज्ञाताने जाळल्यचा प्रकार समोर आला आहे. भटुंबरे गावातील पंडीत शेंबडे यांच्या शेतात पार्क केलेली गाडी पेटवली. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
अहमदनगर येथील कीर्तनकार अजय महाराज बारस्कर आषाढी वारीसाठी १६ तारखेला पंढरपुरात आले होते. काल एकादशीच्या निमिताने ते पंढरपूरातच होते. त्यांनी पंढरपूर येथील ६५ एकरच्या पार्किंगमध्ये गाडी लावलेली होती. त्यानंतर ते गाडी परत घेण्यास गेले असता त्यांची गाडी जळाल्याचे निदर्शनास आले. गाडीचा जळून कोळसा झाला आहे. कोणताही अवशेष शिल्लक नसल्याचे दिसत आहे.

पोलीस तपास सुरू
किर्तनकार अजय महाराज बावस्कर यांनी मागील काही दिवसांपासून त्यांना सतत धमया येत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याच प्रकरणातून तर बारस्कर यांची गाडी जाळली गेली नसेल ना, असाही संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी बारस्करांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर टीका केली होती. त्यानंतर देहू संस्थानकडून अजय बावस्कर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. बारस्कर यांनी पंढरपूर पोलिसांत धाव घेतल्याने पोलीस गाडी कोणी जाळली याचा शोध घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, शहरात खळबळ

Maharashtra Crime News : डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला...

पारनेरचा चेतन रेपाळे उत्तर महाराष्ट्र केसरी; धुळ्याच्या ऋतिकला केले चितपट, ‘असा’ टाकला डाव..

पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शिव छत्रपती संकुलचे नाव राज्यस्तरावर पारनेर | नगर सह्याद्री नाशिक जिल्ह्यातील पाथड...

नगर शहरात चाललंय काय?, अल्पवयीन मुलाचा खुनाचा केला प्रयत्न, वाचा, नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात सोमवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या...

राममंदिराच्या शिखरावर भगवा फडकला! अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वाजारोहण, VIDEO समोर

अयोध्या | नगर सह्याद्री अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर...