पुणे । नगर सहयाद्री-
पोर्शे कार प्रकरणात पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने धनिकपुत्राची आई शिवाणी अग्रवाल हिला अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. चौकशीमध्ये पुन्हा काही नवीन माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे.
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांना अटक केल्यानंतर धनिकपुत्राच्या आईने रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यानतंर गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या बेपत्ता होत्या. मात्र अखेर पोलिसांनी त्यांना शोधून काढले आहे आणि ताब्यात घेतले आहे. आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
तसेच ससूनच्या दोन डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डस्टबिनमध्ये टाकले. त्याच्या जागी त्यांनी त्याची आई शिवानी अग्रवाल हिचे रक्ताचे नमुने घेतले होते. या प्रकरणात डॉक्टरांनी तब्बल 3 लाख रुपयांची लाच घेतली होती. यानंतर पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली होती.