spot_img
महाराष्ट्रसुपा एमआयडीसीतील 'त्यांची' दहशत मोडा; आ. दाते यांनी अधिवेशनात मांडले प्रश्न

सुपा एमआयडीसीतील ‘त्यांची’ दहशत मोडा; आ. दाते यांनी अधिवेशनात मांडले प्रश्न

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर- नगर मतदारसंघातील सुपा एमआयडीसीत आंतरराष्ट्रीय उद्योजक आलेले आहेत. परंतु एमआयडीसीमध्ये स्थानिकांना रोजगार दिला जात नाही. परकियांनाच मोठ्या प्रमाणात रोजगार दिला जातो. सुपा एमआयडीसीमध्ये दहशतीचे वातावरण आहे, त्याचा दुष्परिणाम चांगल्या कंपन्यांवर होत आहे. यामुळे सुपा एमआयडीसीची वाढ खुंटण्याची शक्यता आहे. या परिसरातील दहशत मोडून काढण्यासाठी सरकारने पावले उचलावी अशी मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी केली.

बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी नागपूर येथील अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान आमदार काशिनाथ दाते बोलत होते. आमदार दाते म्हणाले, औचित्याच्या मुद्द्यावर दिव्यांग, संजय गांधी योजनेचे अनुदान वितरण व अनुदानात वाढ करणे याबाबत बोललो आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात देशात अग्रेसर आहे. 14 टक्के पेक्षा अधिक देशांतर्गत उत्पादनात भर पडली आहे. परकीय गुंतवणूक देखील 90% पर्यंत वाढली आहे. या गुंतवणुकीच्या संदर्भात मतदारसंघातील सुपा ही एमआयडीसी येते, ही मध्यवत ठिकाणी एमआयडीसी आहे. येथे आंतरराष्ट्रीय उद्योजक आलेले आहेत. परंतु गेल्या काही वर्षापासून या एमआयडीसी मध्ये स्थानिकांना रोजगार दिला जात नाही.

परकीयांनाच मोठ्या प्रमाणात रोजगार दिला जातो. या कंपन्याभोवती दहशतीचे वातावरण केले जाते, त्याचा दुष्परिणाम या चांगल्या कंपन्यांवर होत आहे. यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. एमआयडीसीमध्ये शांतता राहिली तरच नवनवीन उद्योजक येतील. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे प्राथमिक सोयी सुविधा आहेत. जमीन देखील उपलब्ध आहे. एकास नोकरीला घेण्याचे स्थानिकांना दिलेले आश्वासन पाळले जात नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक व पंतप्रधान ग्राम सडक योजनेची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे पाचशे ते हजार लोकसंख्येची गावे आपल्याला पक्क्या रस्त्याने जोडता येतील. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. तसेच दिवसा शेती पंपासवीज देण्याची मागणी पुर्ण करावी यामुळे माझ्या शेतकऱ्यांना रात्रीचे पाणी भरण्यास जाण्याची गरज पडणार नाही. असे विविध प्रश्न आमदार काशिनाथ दाते यांनी विधीमंडळात मांडले.

पाणी प्रश्न विधानसभेत मांडला
शासनाने पश्चिम घाटावर पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आहे. पारनेर- नगर मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे. अर्धा मतदारसंघ गोदावरी खोऱ्यामध्ये पाणलोट क्षेत्र आहे आणि अर्धा मुळा, कुकडी क्षेत्रामध्ये आहे. यामध्ये गोदावरी खोऱ्यात आम्हाला कुठलाही नवीन प्रकल्प घेता येत नाही, बंधारा देखील नव्याने घेता येत नाही. पश्चिम घाटाचे पाणी वळवल्यानंतर पाण्याची उपलब्धता होते त्या माध्यमातून आमच्या पठार भागाला दोन टीएमसी पाण्याचा प्रश्न आहे तो सोडविणयाची मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कंटेनर चालकाचा प्रताप; दहा ते पंधरा गाड्यांना धडक, अनेकजण जखमी

पुणे / नगर सह्याद्री - चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरने दहा ते पंधरा...

मनपाचा ‘तो’ निर्णय अन्यायकारक! शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, जनतेवर बोजा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी...

.. तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; अविनाश घुले यांचा मनपाला इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर शहरातील नागरिकांना रोज पाणी पुरवठा करावा आणि मगच पाणीपट्टीत वाढ...

कोरठण खंडोबा यात्रोत्सव उत्साहात; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

पारनेर | नगर सह्याद्री:- पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र...