spot_img
अहमदनगरनगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले; कोण आहेत उमेदवार पहा...

नगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले; कोण आहेत उमेदवार पहा…

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
विधानसभा निवडणुकीसाठी धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अद्याप महायुुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जाहीर झाले नाही. परंतु, अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून अचारसंहिता लागू झाली आहे. मंगळवार पासून उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोठातून सांगितले जात आहे. शरद पवार गटाची पहिली ४० पेक्षा अधिक उमेदवारांची यादी तयार असल्याचेही बोलले जातेय. असे असतांनाच शरद पवार गटाची संभाव्य यादी समोर आली आहे. त्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार, राहुरी – प्राजक्त तनपुरे, अकोला अमित भांगरे, पारनेर राणी लंके यांचा समावेश आहे.

तर अजित पवार गटाचीही यादी समोर आली आहे. त्यात अकोला किरण लहामटे, कोपरगाव आशुतोष काळे, नगर शहर संग्राम जगताप यांचा समावेश आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नसून येथे माजी महापौर संदीप कोतकर हे तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी ‘मंगळवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री –  मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...