spot_img
ब्रेकिंगबॉलिवूडचा 'भाईजान' सोबत झळकणार 'श्रीवल्ली'! ईदच्या दिवशी 'या' चित्रपटाचा होणार बिग ब्लास्ट?

बॉलिवूडचा ‘भाईजान’ सोबत झळकणार ‘श्रीवल्ली’! ईदच्या दिवशी ‘या’ चित्रपटाचा होणार बिग ब्लास्ट?

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री-
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिची दक्षिणेत जबरदस्त फॅन फॉलोइंग होती, पण अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तिने त्यात ‘श्रीवल्ली’ची भूमिका करून हिंदी पट्ट्यात आपला ठसा उमटवला. आता ईदच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या एआर मुरुगदासच्या ‘सिकंदर’ मध्ये बॉलिवूडचा ‘भाईजान’ सोबत ‘श्रीवल्ली’ झळकणार आहे.

यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर सलमान खानच्या सिकंदरची घोषणा करण्यात आली. पुढच्या वर्षी ईदला तो सिकंदरच्या भूमिकेत येत असल्याचे सलमानने सांगितले. आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘गजनी’चे दिग्दर्शक एआर मुरुगदास यांनी साजिद नाडियादवालाच्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. आता या चित्रपटाच्या नायिकेबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

याबाबत Nadialwala Grandson या प्रोडक्शन हाउसच्या एक्स अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे. रश्मिका मंदाना आणि सलमान खान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे.बॉलिवूडचा ‘भाईजान’ लवकरच सिकंदर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्यंतरी अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर हल्ला करण्यात आला होता. याबाबत पोलिस तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...