spot_img
अहमदनगरबापासह चिमुकल्याच्या अंगावर टाकले उकळते तेल, पुढे घडले भयंकर...

बापासह चिमुकल्याच्या अंगावर टाकले उकळते तेल, पुढे घडले भयंकर…

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
बापासह सात वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर उकळते तेल टाकून जखमी केल्याची घटना बोल्हेगाव, गांधीनगर परिसरातील मारोती मंदिरा जवळ घडली. दिलीप हंसाराम माली (वय 26) व त्यांचा मुलगा हिमांशु जखमी झाला आहे. जखमींवर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिलीप यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (9 एप्रिल) सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. महेशकुमार लाल सैनी (रा. बोल्हेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मंगळवारी (8 एप्रिल) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यासंदर्भात दिलीप माली यांनी दिलेल्या जबाबानुसार, रात्री अचानक महेशकुमार याने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून मालकाने बोलावले आहे असे सांगितले.

दरवाजा उघडताच महेशकुमारने आपल्या घरातून गरम करून आणलेले तेल मंग्यातून त्यांच्या अंगावर फेकले. या घटनेत दिलीप यांचा 7 वर्षीय मुलगा हिमांशू हाही किरकोळ जखमी झाला आहे. सदरची घटना घडल्यानंतर महेशकुमार घटनास्थळावरून पळून गेला. रात्री 9.30 वाजता घराजवळ कचरा टाकण्याच्या कारणावरून दिलीप माली व महेशकुमार यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्याच रागातून महेशकुमार याने हे कृत्य केले असावे, असा संशय दिलीप माली यांनी व्यक्त केला आहे.

घटनेनंतर दिलीप माली यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या उपचार घेत आहेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार इनामदार तपास करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

पुणे । नगर सहयाद्री :- पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा...

‘पुढील आठवड्यात सरपंच आरक्षण सोडत’

महिला आरक्षण उपविभागीय, तर सर्वसाधारण अन्य प्रवर्गाचे तहसील पातळीवर काढणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री ग्रामविकास विभागाने...

फडणवीस सरकारचा ‘मोठा’ निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

गैरप्रकार सहन केला जाणार नाही: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई | नगर सह्याद्री रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच...

फलक लावणे गैर काय? ते माझे काका!; आमदार रोहित पवारांनी भूमिका केली जाहीर

कर्जत । नगर सहयाद्री:- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर...