spot_img
अहमदनगरचिमुकल्याच्या अंगावर उकळते तेल फेकले! नगर शहरात धक्कादायक प्रकार, कारण आलं समोर..

चिमुकल्याच्या अंगावर उकळते तेल फेकले! नगर शहरात धक्कादायक प्रकार, कारण आलं समोर..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
बापासह सात वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर उकळते तेल टाकून जखमी केल्याची घटना बोल्हेगाव, गांधीनगर परिसरातील मारोती मंदिरा जवळ घडली. दिलीप हंसाराम माली (वय 26) व त्यांचा मुलगा हिमांशु जखमी झाला आहे. जखमींवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलीप यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (9 एप्रिल) सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.

महेशकुमार लाल सैनी (रा. बोल्हेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मंगळवारी (8 एप्रिल) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यासंदर्भात दिलीप माली यांनी दिलेल्या जबाबानुसार, रात्री अचानक महेशकुमार याने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून मालकाने बोलावले आहे असे सांगितले.

दरवाजा उघडताच महेशकुमारने आपल्या घरातून गरम करून आणलेले तेल मग्यातून त्यांच्या अंगावर फेकले. या घटनेत दिलीप यांचा 7 वर्षीय मुलगा हिमांशू हाही किरकोळ जखमी झाला आहे. सदरची घटना घडल्यानंतर महेशकुमार घटनास्थळावरून पळून गेला. रात्री 9.30 वाजता घराजवळ कचरा टाकण्याच्या कारणावरून दिलीप माली व महेशकुमार यांच्यात किरकोळ वाद झाला होता.

त्याच रागातून महेशकुमार याने हे कृत्य केले असावे, असा संशय दिलीप माली यांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर दिलीप माली यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या उपचार घेत आहेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार इनामदार तपास करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पीओपी गणेश मूर्तींबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; ‘ही’ अट ठेवली कायम

मुंबई / नगर सह्याद्री : प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या मूर्ती विरुद्ध शाडूच्या मूर्ती...

अतिवृष्टीमुळे नुकसान; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे विधान…

  नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे / राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, राजुरी ममदापूर, तिसगाव...

विकासकामांच्या माध्यमातून केडगावला नवी दिशा दिली:आ. जगताप

लिंक रोड परिसरातील सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन व वृक्षारोपण अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- केडगाव हे शहराचे सर्वात...

‌‘गोरेश्वर‌’साठी 48 टक्के मतदान! बाबासाहेब तांबे की बाजीराव पानमंद?, निकालाकडे पारनेरकरांचे लक्ष

पारनेर | नगर सह्याद्री गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2025 चे मतदान...