spot_img
अहमदनगरबबो!! हळदीचं जेवण बाधलं! नगरमध्ये २०० जणांना विषबाधा

बबो!! हळदीचं जेवण बाधलं! नगरमध्ये २०० जणांना विषबाधा

spot_img

अकोले। नगर सहयाद्री- हळदी समारंभात असलेल्या जेवणातून जवळपास २०० लोकांना विषबाधा झाली आहे. अकोले तालुयातील मवेशी करवंदरा येथे ही घटना घडली. यामध्ये ५४ लोकांची प्रकृती गंभीर असून बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मवेशी करवंदरा येथील एका हळदी समारंभात (दि. २७ फेब्रुवारी) दुपारी हळदीच्या कार्यक्रमात अनेकांनी जेवण केले. त्याच दिवशी संध्याकाळी व दुसर्‍यादिवशी सकाळी जेवण केलेल्या लोकांना त्रास जाणवू लागला. यामुळे लागलीच या सर्वांना राजुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींना नाशिक येथे हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार २६ रुग्ण राजूर रुग्णालयात, कोहणे ग्रामीण रुग्णालयात १६, तर खिरबिरे येथे १२ रुग्ण दाखल असून, २० रुग्णांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतरही काही उपचाहर घेत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन याना माजी आमदार वैभवराव पिचड यांनी संपर्क करून रुग्णाची माहिती देऊन उपचारासाठी प्रयत्न केले. हळदी समारंभामध्ये जेवणामधून नागरिकांना विषबाधा झाल्याचे समजताच राजूर ग्रामीण हॉस्पिटल येथे तातडीने जाऊन रुग्णांची विचारपूस केली. दूरध्वनी वरून सिव्हील सर्जन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच राजूर येथील डॉटर यांना सर्व उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

विषबाधा झालेल्यांची नावे : १) कृष्णा रामचंद्र भांगरे २) सार्थक भाऊ भांगरे ३) सखुबाई संजय कोंडार ४) बुधाबाई शरद कोंडार ५) सुलाबाई अशोक कोंडार ६) तेजस शरद कोंडार ७) गणेश दौलत मोहंडुळे ८) मनीषा शंकर भांगरे ९) देवकाबाई भाऊ भांगरे १०) सोलाजी बुधा कवटे ११) समीर निवृत्ती भांगरे १२) निखिल वाळू भांगरे १३) बत हिराबाई बाळू भांगरे १४) अलकाबाई शंकर भांगरे १५) तानाबाई नामदेव भांगरे १६) सबिता सुरेश कडव १७) सीताराम गोगाजी १८) मिराबाई नामदेव भांगरे १९) आदित्य गोरक्ष भांगरे २०) सुमन बाळू कोंडार आदींसह जवळपास हा आकडा १५० च्या आसपास जाण्याची शयता व्यक्त होत आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...