सिंधुदुर्ग | नगर सह्याद्री
राज्यात मागील काही दिवसांत पाण्यात बुडून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी सिंधुरदुर्ग मध्ये बोट उलटून सात जण बुडाल्याची घटना समोर आली आहे. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरात जाणारी एक बोट बुडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण बेपत्ता आहेत. बेपत्तांचा शोध सुरू आहे.
वेंगुर्ले बंदरात रात्री मच्छिमार बोटींना लागणार बर्फ घेऊन बोट घेऊन जात असताना बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. बोट पलटी झाल्यानंतर तीन जणांनी पोहून किनारा गाठला. तर चार जण बेपत्ता होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत, शोध मोहीम सुरु आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणारा बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडला. रात्री वादळी वारे वाहत होते अशी परिस्थितीमुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले.