spot_img
ब्रेकिंगरक्तरंजित राडा; होळीच्या दिवशी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाला संपवल!

रक्तरंजित राडा; होळीच्या दिवशी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाला संपवल!

spot_img

Crime News: होळीच्या दिवशी पंजाबमध्ये रक्तरंजित राडा झाला. पंजाबच्या मोगामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंगत राय मंगा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसाठी काम करत होते. मंगत हे गुरुवारी रात्री १० वाजता दूध आणायला गेले. त्याचवेळी तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अज्ञातांनी गोळीबार केला. त्यावेळी एका ११ वर्षीय मुलाला गोळी लागली. त्यानंतर दुचाकी सोडून मंगत राय मंगा यांनी गोळीबार करणाऱ्यांचा पाठलाग केला.

त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर गोळीबार करणारे घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी मंगत यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मंगत यांना मृत घोषित केले. तर ११ वर्षीय जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी मुलाला सुरुवातीला मोगा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

विश्व हिंदू शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोंगिदर शर्मा यांनी सांगितलं की, ‘मंगत राय मंगा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगत राय मंगा यांच्या मुलीने सांगितलं की, ‘माझे वडील रात्री आठ वाजता दूध आणायला घराबाहेर गेले होते. त्यानंतर नेमकं काय झालं, माहीत नाही. त्यानंतर अकरा वाजता माहिती मिळाली की, वडिलांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही त्यासाठी काहीही करायला तयार आहोत’. गुरुवारी रात्री ९ वाजता मोगा येथे दुचाकीवरील तिघांनी एका सलून मालकावर गोळीबार केला.

केस कापायचे आहेत, असं सांगून सलूनमध्ये शिरले. त्यानंतर त्यांनी सलून मालकावर गोळीबार केला. सलून मालकावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी सलून मालकाच्या पायाला लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डीएसपी सिटी रविंदर सिंह यांनी सांगितलं की, एकाच वेळी दोन ठिकाणी गोळीबार झाला. बागेआना वस्तीत एका सलूनमध्ये गोळीबार झाला. त्यात एक जण जखमी झाला. तर दुसरी गोळीबाराची घटना ही स्टेडिअयम रोडवर झाली. त्यात मंगत राय मंगा यांच्यावर गोळीबार झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवगृहात ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...

रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी...