Crime News :रंगपचंपमीच्या दिवशी चिमुकल्या मुलासमोरच बापाचा आणि काकाचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे शहर उपाध्यक्ष आणि त्यांच्या भावावर कोयत्याने राहत्या घरासमोरच सपासप वार केले. उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचा सख्खा भाऊ प्रशांत जाधव असे मयत तरुणांचे नाव आहे.
नाशिकमधील बोधलेनगरजवळच्या आंबेडकरवाडीमध्ये जाधव कुटूंब वास्तव्यास आहे. उमेश उर्फ मन्ना जाधव नाशिक राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर उपाध्यक्ष आहे. यांच्या राहत्या घरासमोर हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले. सुदैवाने कुटुंबीयावर हल्लेखोरांनी हल्ला केला नाही, मात्र दोघा भावांनी प्रतिकार केला असता हल्लेखोरांनी त्यांचा जीव घेतला, असे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान एका लहान मुलांच्या समोर दोन्ही भावांवर टोळक्याने हल्ला केल्याने मुलगा घाबरून पळून गेला. या हल्ल्यात दोन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी उप नगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच तसेच संशयित हल्लेखोर यांच्या मागावर चार पथके रवाना करण्यात आली आहेत. खुनाच्या घटनेने रंगपंचमीमध्ये बे रंग झाल्याने शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.