spot_img
अहमदनगरतरुणावर रक्तरंजित हल्ला! 'या' हॉटेलमध्ये भयंकर प्रकार, घटना CCTV मध्ये कैद

तरुणावर रक्तरंजित हल्ला! ‘या’ हॉटेलमध्ये भयंकर प्रकार, घटना CCTV मध्ये कैद

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड तालुक्यातील नान्नज गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला तिघांनी लाकडी ठोकळ्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 17 जून 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता घडली असून, घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. विक्रम बबन कोळी (रा. पोतेवाडी, ता. जामखेड) हा नान्नज येथील एका हॉटेलमध्ये आपल्या भावाची वाट पाहत थांबला होता. पाणी घेण्यासाठी गेल्यानंतर त्याचा पाय चुकून तिथे बसलेल्या सोमनाथ मोहळकर याला लागला. यावरून किरकोळ वाद निर्माण होऊन, सोमनाथने विक्रमला “तुला दाखवतो” म्हणत धमकी दिली.

विक्रम हॉटेलबाहेर आल्यावर सोमनाथ मोहळकर, आदिल शेख आणि छोट्या शेख यांनी त्याला घेरले. तिघांनी मिळून त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी छोट्या शेख याने मटण तोडण्यासाठी वापरला जाणारा लाकडी ठोकळा विक्रमच्या डोक्यावर फेकून मारला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. विक्रमचा भाऊ रमेश कोळी याने भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही सोमनाथ मोहळकरने मारहाण केली. आदिल शेख व छोट्या शेख यांनीही रमेशला शिवीगाळ करून, “आमच्या नादी लागलात तर संपवून टाकू, अशी धमकी दिली.

या प्रकरणी विक्रम कोळी याच्या तक्रारीवरून सोमनाथ मोहळकर, आदिल शेख आणि छोट्या शेख (सर्व रा. नान्नज) यांच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एस. डी. लोंखडे करत आहेत. जखमीच्या नातेवाइकांनी पोलिसांना निवेदन देत आरोपींना तातडीने अटक करून योग्य कलमांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्याने आणि सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी देखील या प्रकरणात त्वरीत आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मला गोळ्या घाला, मी बलिदान द्यायला तयार’; मराठे मुंबईच्या दिशेने रवाना

Manoj Jarange Patil March: मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठी समाजाला ओबीसीतून आरक्षण...

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ चार हॉटेल्स सील, नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी...

गणपती बप्पा मोरया; वाचा कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा...

बाप्पा गणेशा, जरांगे पाटलांच्या जोडीने तुझंही स्वागत!

आयजी कराळे साहेब, वर्षभरापूर्वी तुमच्या डीजे बंदीला तुमच्याच अधिकाऱ्यांनी फाट्यावर मारले! कोण आवर घालणार...