spot_img
अहमदनगरकृषी सेवा केंद्रातील काळाबाजार भोवला; ४२ जणांवर कृषी विभागाची मोठी कारवाई...

कृषी सेवा केंद्रातील काळाबाजार भोवला; ४२ जणांवर कृषी विभागाची मोठी कारवाई…

spot_img

कृषी विभागाची जिल्ह्यात कारवाई
अहमदनगर / नगर सह्याद्री –
खरीप हंगाम सुरू झालेला असून बाजारामध्ये शेतकर्‍यांची बी-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरू झालेली आहे. खरीप हंगाम २०२४-२५ साठी शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत आणि वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याच्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केलेले आहे. दरम्यान खते, बियाणे काळा बाजार, खरेदी विक्रीचे दप्तर न ठेवणे, बियाणांच्या गुणवत्ता यासह अन्य तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीअंती जिल्ह्यातील २० कृषी निविष्ठा विक्रीचे परवाने कायमस्वरूपी, तर २२ परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत.

नगर जिल्ह्यात कृषी विभागाने जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना केलेली आहे. तसेच प्रत्येक तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्ह्यातून बियाण्यांचे ३५५, खतांचे ३५० आणि कीटक नाशकांचे ७८ नमुने काढून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी १५ भरारी पथके जिल्ह्यामध्ये कार्यरत करण्यात आलेली असून भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्याची अचानक तपासणी केली जात आहे. शेतकर्‍यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणार्‍या विक्री केंद्रावर तातडीने कारवाई केली जाणार आहे.

निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या आतापर्यंत १६ बियाणे विक्री केंद्राचे, ४ खते विक्री केंद्राचे आणि २ कीटकनाशक विक्री केंद्राचे परवाने तत्पूर्ते निलंबीत तर ८ बियाणे, ९ खते आणि ३ कीटकनाशक परवाने कायम स्वरूपी रद्द करण्यात आलेली आहेत. १५ पेक्षा जास्त केंद्रांना नोटीस बजावण्यात आलेले आहे. निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्ह्यामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी सुधाकर बोराळे कृषी दिला आहे. खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी दुकानातून कृषी निविष्ठा खरेदी करताना पक्की बिले ताब्यात घ्यावीत, तसेच बियाणे पिशवी व टॅग जपून ठेवावा. तसेच निविष्ठाच्या गुणवत्ताबाबत तक्रार असेल तर तात्काळ टोल फ्री क्रमांक ११००२३३४००० किंबा ९८२२४४६६५५ या क्रमांकाव कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

या तालुक्यात कारवाई
यंदा नगर दक्षिणेत चांगला पाऊस झालेला असून यामुळे याठिकाणी हंगाम जोरात आहे. १० जुलैपर्यंत जिल्ह्यात ९७ टक्क्यांपर्यंत खरीप हंगामाची पेरणी पोहचलेली आहे. बियाणे, खते, बिल, गणवत्ता याबाबत तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने केलेल्या तपासणीत नेवासा, पाथर्डी, श्रीगोंदा, नगर आणि कर्जत तालुक्यात कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर कारवाई केलेली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना गुड न्यूज! जूनचा हप्ता जमा होणार? आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

मुंबई। नगर सहयाद्री:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या...

राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र; राज्याचे लक्ष ‘विजयी मेळावा’ कडे

मुंबई । नगर सहयाद्री :- राज्यात त्रिभाषा सूत्राविरोधात निर्माण झालेल्या वातावरणानंतर आज मुंबईत वरळी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या ग्रहांनी दिशा बदलली, कुणाच्या कुंडलीत काय? पहा एका क्लिकवर..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य अलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा...

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...