spot_img
महाराष्ट्रसंभाजीराजेंच्या आंदोलनाची भाजपाकडून पाठराखण;तर जशास तसं प्रत्युत्तरदेणार

संभाजीराजेंच्या आंदोलनाची भाजपाकडून पाठराखण;तर जशास तसं प्रत्युत्तरदेणार

spot_img

अमरावती : नगर सह्याद्री
विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांनी 14 जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा दिला होता. मात्र संभाजीराजे गडावर पोहोचण्यापूर्वीच हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. गडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये हिंसाचाराचा प्रचंड उद्रेक झाला. त्या हिंसाचारामध्ये वाहनांची, घरांची तसेच इतर मालमत्तांची जोरदार नासधूस करण्यात आली होती.

मात्र, संभाजीराजेंनी विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आंदोलनाची घेतलेली भूमिका योग्य असल्याचे म्हणत भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी त्यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे संभाजीराजेंच्या भूमिकेचे समर्थनच केले आहे.

विशालगड ईथं खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. 158 अतिक्रमण साफ करण आवश्यक आहे. यासाठी जर कोणी आंदोलन करत असेल तर आम्ही त्याचे समर्थन करतो. विशालगड ईथलं अतिक्रमण काढू नये, यासाठी जर कोणी मोर्चा काढत असेल तर आम्हीही जशाच तसं प्रत्युत्तर देत मोर्चे काढू. असा इशाराही आमदार अनिल बोंडे यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना बोंडे यांनी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना देखील टोला लगावला आहे. काल काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली होती. या टिकेला भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलय. यावेळी ते म्हणाले की, यशोमती ठाकूर ज्यावेळी महिला व बालकल्याण मंत्री होत्या तेव्हा त्यांनी महिलांना 50 रुपये तरी दिले का, असा टोला अनिल बोंडे यांनी लगावलाय. आज कोट्यावधी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.

यशोमती ठाकूर यांनी स्वतःला विचारायला पाहिजे, ज्यावेळी त्या महिला व बालकल्याण मंत्री होता तेव्हा अंगणवाडी सेविकांचं काही मानधन वाढवलं नाही. आशा सेविकांच वेतन काही वाढवलं नाही. महिलांना मदत केली नाही. यशोमती ठाकूर यांच्या घरी स्वयंपाक करणारी, भांडे घासणारी आमच्या माता भगिनींना सुद्धा पंधराशे रुपये मिळणार आहेत. तुम्ही त्या महिलांना किती पगार देता हे ही तुम्हाला माहीत नाही. म्हणून तुमच्या पोटात दुखत असल्याचे ही अनिल बोंडे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भारत-पाक तणाव वाढला, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; RAWच्या माजी प्रमुखांवर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध ताणलेले असताना मोदी सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा...

नगरमध्ये बसस्थानकावर दोघा भावांवर जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडल पहा

  अहिल्यानगर / नगर सह्याद्री - वाटेफळ (ता. अहिल्यानगर) येथील सर्विस रस्त्यावरील बस स्थानकावर रविवारी (27...

शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या, मुंबईला जायचं, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

बीड / नगर सह्याद्री : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं...

भयंकर…! चौथी मुलगी झाल्याने आई बनली हैवान; बाळा सोबत केले नको ते…

नगर सह्याद्री वेब टीम : डहाणू शहरातील लोणीपाडा येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे....