शहर भाजपच्या ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पात्रांचे वितरण
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे सुरू झाले आहे. लवकरच महानगरपालिकेचेही पडघम वाजणार आहेत. अहिल्यानगर शहरातील भारतीय जनता पाटच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी कटिबद्ध व्हावे. ही निवडणूक आपण पूर्ण ताकदीने व जिंकण्याच्या निश्चयानेच लढणार आहोत. येणारा महापौर हा भारतीय जनता पाटचाच होण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आजपासूनच कामाला लागावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगर शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे. भाजपची कायम ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका आहे. त्यामूळे भाजपच्या ओबीसी आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ओबीसी मधील सर्व घटकांना बरोबर घेत भारतीय जनता पाटचे कार्य, ध्येयधोरणे व केलेले विकास कामे त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
अहिल्यानगर शहर भाजपच्या ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, सरचिटणीस महेश नामदे व निखील वारे, ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, माजी नगरसेवक धनंजय जाधव, ओबीसी मोर्चा अध्यक्ष गणेश विद्दे, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया जाणावे, अशोक गायकवाड, रामदास आंधळे, बाळासाहेब भुजबळ, ॲड.गाली आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली शहरात भाजपचे काम जोऱ्यात सुरु आहे. शहराच्या विकासासाठी मंत्री विखे यांनी मोठे सहकार्य करत निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरातील ओबीसी समजतील सर्व घटक भाजपच्या झेंड्याखाली एकवटला आहे.
यावेळी ओबीसी आघाडीचे सरचिटणीस विनोद बोगा व रोहित पठारे, सहचिटणीस मुकुंद लखापती व कुंडलिक गदादे, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत फंड, मध्य मंडल अध्यक्ष सचिन पळशीकर, सदस्य शरद कोंडा, जितेंद्र बिजा, राजेश धवन आदींसह पदाधिकाऱ्यांना मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आली.



