spot_img
ब्रेकिंगभाजपचा 'मास्टर प्लान' ; १७ जिल्ह्यांत 'संपर्कमंत्री'

भाजपचा ‘मास्टर प्लान’ ; १७ जिल्ह्यांत ‘संपर्कमंत्री’

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस सुरू असताना भाजपने 17 जिल्ह्यांत संपर्कमंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. आहे. ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्कमंत्री देऊन भाजपाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यात भाजपने संपर्कमंत्री दिले आहेत.राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ पालकमंत्री असलेल्या वाशीम जिल्ह्यात भाजपने जिल्हा संपर्कमंत्री म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्यात अनुक्रमे चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे हे भाजपचे जिल्हा संपर्कमंत्री असणार आहे.

गोंदिया- डॉ. पंकज भोयर, बुलढाणा-आकाश फुंडकर, यवतमाळ-अशोक उईके, वाशीम- राधाकृष्ण विखे पाटील, छ. संभाजीनगर- अतुल सावे, बीड- पंकजा मुंडे, धाराशिव- जयकुमार गोरे, हिंगोली-मेघना बोर्डिकर, जळगाव – गिरीश महाजन, नंदुरबार – जयकुमार रावल, मुंबई शहर- मंगलप्रभात लोढा, ठाणे- गणेश नाईक, रायगड- आशिष शेलार, रत्नागिरी-नितेश राणे, सातारा – शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूर – माधुरी मिसाळ, पुणे – चंद्रकांत पाटील यांची संपर्कमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सणाला गालबोट! दोन गटात राडा; वाद सोडवणे पोलिसाला भोवले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बिहारच्या मुंगेरमध्ये दोन गटाचा वाद सोडवायला गेलेल्या सहायक पोलीस...

१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र शासनाने फास्टॅगसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता १ एप्रिलपासून प्रत्येक...

कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ! हायकोर्टात याचिका..

Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात...

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...