spot_img
देशदिल्लीत भाजपची आघाडी! आपची घसरगुंडी..

दिल्लीत भाजपची आघाडी! आपची घसरगुंडी..

spot_img

Delhi Election Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांच्या निकालासाठी आज मतमोजणी होत आहे. दरम्यान सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात भाजपने मुसंडी मारली आहे. 

मतमोजणीनूसार भाजपाने दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. तर आपचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल दिसत आहे. दिल्लीत भाजप 40, आप 30 जागांवर आघाडीवर आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांवर कोण बाजी मारणार, याबद्दल राजकीय वर्तुळाला उत्कंठा आहे. यापूर्वी 2013, 2015 आणि 2020 या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने सहज विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्ली म्हणजे ‘आप’ आणि अरविंद केजरीवाल असे अलिखित समीकरण तयार झाले होते. परंतु, यंदा भाजपने दिल्ली विजय मिळवण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती. भाजपकडून सातत्याने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांमुळे दिल्लीकरांचा अरविंद केजरीवाल आणि ‘आप’वरील विश्वास डळमळीत होतो का, हे आज जाहीर होणाऱ्या निकालांमधून स्पष्ट होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...