अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून भाजपने डाव टाक अहिल्यानगर शहरातील शिवसेनेला झटका दिला आहे. शिवसेनेचे माजी उपमहापौर अनिल बोरुडे, स्थायी समितीचे माजी सभापती सुभाष लोंढे यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असून ते नगरमध्ये होते असलेल्या कार्यक्रमात समर्थकांसोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीला राजकीय रंग येण्यास सुरुवात झाली आहे. सोयीनुसार पक्ष प्रवेशाच्या राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. ठाकरे शिवसेनेच्या बहुतांश नगरसेवकांनी या अगोदरच जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.
तसेच अजूनही ठाकरे सेनेतील काही नगरसेवक राष्ट्रवादी व भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यात ठाकरे सेनेचे माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी सभापती सुभाष लोंढे, माजी सभापती पुष्पा बोरुडे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख महेश लोंढे, जालिंदर वाघ, अभिजित बोरुडे, उद्योजक निखिल नहार यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी दिली.



