spot_img
अहमदनगरपालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना...

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

spot_img

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे आणि नगर शहरचे आ. विक्रम पाचपुते निवडणूक प्रमुख
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील निवडणूक प्रमुख निवडले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. आहिल्यानगर शहर निवडणूक प्रमुख विक्रम पाचपुते असतील. आहिल्यानगर उत्तर जिल्हा स्नेहलता कोल्हे, अहिल्यानगर दक्षिण जिल्हा निवडणूक प्रमुख डॉ. सुजय विखे हे असतील.

बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आ. सुरेश धस तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर धस -मुंडे वाद पहायला मिळाला होता. मात्र आता या निवडणुकीमध्ये दोघांनाही एकत्रित पक्षाचे काम करावे लागणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती
भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रमुख आणि निवडणुका प्रभारींची यादी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप क्शन मोडवर आले आहे. भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहर, ग्रामीण, कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई या सर्व ठिकाणी गणेश नाईक निवडणूक प्रभारी असणार आहेत.

कोणत्या जिल्ह्यात कोणाची नियुक्ती ?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे निवडणूक प्रभारी तर पुणे ग्रामीण मध्ये गणेश बिडकर यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुंबईत आशिष शेलार हे निवडणूक प्रभारी असणार आहेत. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात मंत्री जयकुमार गोरे हे प्रभारी असणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे हे निवडणूक प्रभारी असणार आहेत. तर नांदेड जिल्ह्यात खासदार अशोक चव्हाण हे निवडणूक प्रभारी असणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात खासदार धनंजय महाडिक हे निवडणूक प्रभारी असणार आहेत. रायगडमध्ये प्रशांत ठाकूर हे निवडणूक प्रभारी असणार आहेत. नाशिकमध्ये गिरीश महाजन तर जळगावमध्ये संजय सावकारे निवडणूक प्रभारी असणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील निवडणूक प्रभारी असणार आहेत. तर पुणे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ निवडणूक प्रभारी असणार आहेत. रत्नागिरीत निरंजन डावखरे हे निवडणूक प्रभारी असणार आहेत, तर सातार्‍यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे निवडणूक प्रभारी असणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...

मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट; कोणी दिली सुपारी; बड्या नेत्याचे नाव

बीड / नगर सह्याद्री मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा एक...