spot_img
ब्रेकिंगभाजपच्या 'बड्या' नेत्याच्या सभेत राडा! कुठे घडाला प्रकार?

भाजपच्या ‘बड्या’ नेत्याच्या सभेत राडा! कुठे घडाला प्रकार?

spot_img

नांदेड | नगर सह्याद्री
काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मराठा समजााच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून मराठा समाज बांधव त्यांच्याकडे आरक्षणाच्या मुद्दयावरुन जाब विचारत आहेत. दरम्यान गुरुवारी सभा सुरु असतांना मराठा बांधवांनी घोषबाजी केली. भाषण थांबवून त्यांचे निवेदन स्विकारल्यानंतर सभा पुन्हा सुरु झाली.

राज्यात आणि केंद्रात सध्या भाजपाप्रणित आघाडीची सत्ता आहे. त्यातच, भाजपात प्रवेश करताच अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकीही देण्यात आली. त्यामुळे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी समाज बांधवांकडून अशोक चव्हाणांना पोटतिडकीने जाब विचारला जात आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी ते सध्या गावदौर आणि प्रचार सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान बनविण्याचं आवाहन करत आहेत. त्यावर, समाजाच्या भावना तीव्र होतानाचे दिसून येते. अशोक चव्हाण यांच्यावर भाजपाने नांदेडची जबाबदारी दिली असून नांदेडचा खासदार विजयी करण्यासाठी चव्हाण मतदारसंघात फिरत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...