spot_img
अहमदनगरभाजपा बळीराजासोबत! 'निसर्गाच्या प्रकोपाशी दोन हात करणार

भाजपा बळीराजासोबत! ‘निसर्गाच्या प्रकोपाशी दोन हात करणार

spot_img

भाजप नेते विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे | वडुले, पानोली, सांगवी सूर्या गांजीभोयरात चारा वाटप

पारनेर | नगर सह्याद्री

पारनेर तालुक्याच्या पाचवीला कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी गारपीट हे समीकरण तयार झाले असून निर्सगाच्या या प्रकोपाशी दोन हात करण्यासाठी भाजपा सह शिंदे सरकार बळीराजासोबत असल्याचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी केले आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे व तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी वडुले, पानोली, सांगवी सूर्या गांजीभोयरातील दुध उत्पादक शेतकरांना १२ टन चारा वाटप करण्यात आले. यावेळी शेतकरांना धीर देत शासन व प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

अस्मानी संकटाला सामोरे जाण्यासाठी शासनासह आपण सर्वजन एकदिलाने व एकसंघपणे लढत असून लवकर आणि खात्रीने या संकटातून आपण बाहेर पडू. कुठल्याही पशुपालक शेतकर्‍यांने गोंधळून न जाता, चिंतीत न होता शासन प्रतिनिधी अथवा स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क केल्यास अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे व भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी या भागात खासदार डॉ. सुजय विखे पाटील, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यातून करण्यात येत असलेल्या चारा वाटप प्रसंगी पिडीत शेतकर्‍यांना दिला. तालुक्यातील सांगवी सूर्या, वडुले, पानोली, गांजीभोयरे यांसह विविध गावांत गारपिट व अवकाळी पावसाच्या तडाख्यात नगदी पिकांसह चारापिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे या गावांतील पशुपालकांसमोर चारा टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे.

या परिसरात झालेल्या जोराच्या गारपिटीमुळे चारा पिकांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. चारा सडल्यामुळे जनावरांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर पाणी उपलब्ध असलेल्या शेतकर्‍यांनी उन्हाळी चारा पीक घेण्याची कितीही घाई केली तरी शेतात पिकवलेला चारा जनावरांना खाण्यायोग्य होण्यास दोन महीण्यांहून अधिक कालावधी जाणार याची प्रशासनास कल्पना दिली असून त्यादृष्टीने योग्य ती पाऊले टाकण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

यावेळी वडूले, पानोली, गांजीभोयरे व सांगवी सुर्या आदी गावांत कोरडे यांनी १२ टनांहुन अधिक चार्‍यासाठी उसाचे वाटप केले असुन त्यांना स्थानिक नागरीकांचेही चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. भाजपा कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे व भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करुन परिस्थितीची जाणीव करुन देत कराव्या लागणार्‍या उपाय योजनांविषयीही सविस्तर चर्चा केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...