spot_img
अहमदनगरभाजपा ‌‘मविआ‌’ला धक्का देणार; मिशन लोटसची चर्चा; खा. लंके यांनी बोलावलेली ‌‘ती‌’...

भाजपा ‌‘मविआ‌’ला धक्का देणार; मिशन लोटसची चर्चा; खा. लंके यांनी बोलावलेली ‌‘ती‌’ बैठक रद्द!

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
भाजप महाविकास आघाडीला लवकरच धक्का देण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली असल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून वेगाने चर्चेत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पाट शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा आहे. काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मविआच्या खासदारांमध्ये चलबिचल असल्याच्या चर्चा आहेत. मविआचे खासदार भाजप आणि इतर पक्षांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या गोटातून समोर आलीय! दरम्यान, मागील आठवड्यात नगरचे खासदार नीलेश लंके यांनी मतदारसंघातील निवडक शिलेदारांना दि. 13 डिसेंबर रोजी दिल्लीत बोलावणे धाडले होते.

त्यानुसार पारनेरच्या संपर्क कार्यालयातून काहींनी निरोपही देण्यात आले. लंके हे दि. 13 रोजी गुडन्यूज देतील अशी अटकळ त्यातून बांधली जात होती. मात्र, त्यांनी दि. 13 रोजीची त्यांची दिल्लीतील निवडक सहकाऱ्यांसोबतची बैठक अखेर रद्द केली असल्याची माहिती स्वत: खा. लंके यांनी संबंधितांना फोन करून दिल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडीतील विशेषत: शरद पवार यांच्या गटातून निवडून आलेल्या 9 पैकी सहा खासदारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त सर्वप्रथम ‌‘नगर सह्याद्री‌’ंने प्रकाशित केले होते. यानंतर गेल्या दोन दिवसात विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमधून या बातम्या झळकत आहेत. राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरं जाण्यासंदर्भात चर्चा पाहायला मिळत आहेत. लोकसभेला महाराष्ट्रात भाजपला यश मिळालं नव्हतं. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशन लोटस राबवलं जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

महाविकास आघाडीचे खासदार ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आहेत, विशेषत: शरद पवार गटाचे खासदार जिथं आहेत तिथं महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. त्याचबरोबर मतदारसंघातील विकास हाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. जर आपलं राजकीय भविष्य नीट व्हावं असं त्यांना वाटत असेल. केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे. आपल्या मतदारसंघात विकासकामं करणं प्राधान्याचा विषय राहणार आहे. स्वत:चं राजकीय भविष्य, कार्यकर्त्यांचा आग्रह, ज्यासाठी निवडणूक लढवतो तो विकास अशी मानसिकता असेल तर यासाठी शरद पवार गटाचे खासदार अशी भूमिका घेऊ शकतात. आपल्याला विकास हवा असेल तर सत्तेच्या माध्यमातून गतीनं विकास करता येतो. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं भक्कम सरकार दोन्ही ठिकाणी आहे. त्यामुळं अशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो. शरद पवार साहेबांचे असतील किंवा मविआचे खासदार आमच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात राहण्याची शक्यता आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

दरम्यान, खा. लंके यांनी दिल्ली येथे बोलावलेली दि.13 डिसेंबर रोजीची बैठक का रद्द झाली आणि आता ही बैठक कधी होणार याबाबत कोणत्याही सुचना अथवा निरोप संबंधितांना मिळालेले नाहीत. मात्र, बैठक होणार असल्याचे निरोप पारनेर कार्यालयातून आता ही बैठक रद्द करण्यात आल्याचे निरोप स्वत: खा. लंके यांनी दिल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...